Pune Crime : मोदींना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करणं भोवलं, तरुणावर गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करणे एका तरुणाला चांगलेच भोवले आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 9 Oct 2023
  • 01:51 pm
Pune Crime : मोदींना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करणं भोवलं, तरुणावर गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोशल मीडियावरून अश्लील भाषेत शिवीगाळ करणे एका तरुणाला चांगलेच भोवले आहे. पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात शिवीगाळ करणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हिंदू देवदेवतांबाबत अश्लील आणि अर्वाच्य भाषेत तरुणाचे टिपण्णी केली होती.

सागर सावंत (वय ३१) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर रवींद्र पडवळ यांनी याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा बुदमध्ये राहणाऱ्या मित्र सुजित खेडकर याच्या इन्साग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच हिंदू देव देवतांविषयी बोलताना आणि प्रत्युत्तर देताना खालच्या आणि अश्लील भाषेत वाक्य वापरले. त्यामुळे, धार्मिक भावना दुखावल्या म्हणून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. पुणे ग्रामीण परिसरात काम करणाऱ्या भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संबंंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest