Pune Crime News : अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी विकृतावर गुन्हा दाखल

क्लासला जाणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ (Pune Crime News) दाखवल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड येथील एका कोचिंग क्लासच्या लिफ्टमध्ये 11 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By saheer shaikh
  • Sun, 5 Nov 2023
  • 10:50 am
Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : क्लासला जाणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ (Pune Crime News) दाखवल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड येथील एका कोचिंग क्लासच्या लिफ्टमध्ये 11 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथील मयूर कॉलनी येथील मयुरेश बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर ही मुलगी  कोचिंग क्लासला जात होती.  आरोपीने लिफ्टमध्ये घुसून त्याच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ सुरू केला. तो व्हिडिओ अल्पवयीन मुलीला दाखवला.

पोलिसांनी कलम 354 (ए), 354 (डी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोथरूड पोलीस (Kothrud Police) अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest