संग्रहित छायाचित्र
पुण्यातील लोहगाव परिसरात गोळीबार करून दहशत निर्माण केल्याचा आरोपीची मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हेगारी व विध्वंसक प्रतिबंधक कायद्याने (एमपीडीए) करण्यात आलेल्या स्थानबध्दतेच्या कारवाईतून मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिला. त्यामुळे, पुणे पोलीसांना मोठा झटका बसला आहे.
नितीन किसन सकट (वय २१, रा. खेसेपार्क, लोहगाव) असे आरोपीचे नाव आहे. दारूच्या नशेत पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून दशहत निर्माण केल्याचा गुन्हा सकट व त्याच्या साथीदारांविरूध्द नोव्हेंबर २०२२ दाखल आहे. पोलिसांनी त्याला १५ मे २०२३ रोजी कारवाई करून अमरावती कारागृहात स्थानबध्द केले होते.
त्याविरोधात त्याने उच्च न्यायालयत धाव घेतली होती. न्यायालयात पोलिसांच्या साक्ष विसंगत असल्याचे बचाव पक्षातर्फे ऍड. दुर्गे आणि ऍड. खोशे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे, आरोपीला न्यायालयाने स्थानबध्दतेच्या कारवाईतून मुक्त केले आहे.