Fraud : संरक्षण दलातील जवानाची ७४ लाखांची फसवणूक

ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने संरक्षण दलातील जवानाची ७४ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोडी (सीएमई) येथील ३४ वर्षीय जवानाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Fraud : संरक्षण दलातील जवानाची ७४ लाखांची फसवणूक

संग्रहित छायाचित्र

ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने संरक्षण दलातील जवानाची ७४ लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मिलिटरी अभियांत्रिकी महाविद्यालय, दापोडी (सीएमई) येथील ३४ वर्षीय जवानाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ मार्च ते २७ सप्टेंबर या कालावधीत घडला आहे.

ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी चालवणारा अज्ञात इसम, टेलीग्राम वरून बोलणारी दिशा नावाची व्यक्ती, टेलीग्राम वरुन बोलणारी स्वीनल नावाची व्यक्ती, ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी कस्टमर केअर वरून संपर्क करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार जवानाला वारंवार फोन करून त्यांना एक लिंक पाठवली. त्यावर लॉग इन करण्यास सांगून ट्रीप अॅडव्हायजर ट्रॅव्हल एजन्सी टास्क पोर्टल चालवत असल्याचे सांगितले. या टास्कमध्ये सहभाग घेऊन टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. जवानाला टास्क पूर्ण करण्यास सांगून कोणत्या ना कोणत्या कारणावरून टास्क पूर्ण न झाल्याने गुंतवलेली रक्कम परत मिळवण्यासाठी आणखी रकमेची मागणी केली गेली. त्यानुसार आरोपींनी जवानाकडून एकूण ७४ लाख ३ हजार ४४९ रुपये घेतले. त्यानंतर त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केली. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी गवारे तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest