“पंगा घ्याल तर जिवंत सोडणार नाही”, वाहनांची तोडफोड करणाऱ्या ३ जणांना अटक

“आमच्याशी कोणी पंगा घ्यायचा नाही, नाहीतर जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी देत दहशत पसरवली. हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी पुण्यातील फुरसुंगीमधील गंगानगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 10 Aug 2023
  • 02:37 pm

वाहनांची तोडफोड करणाऱ्या ३ जणांना अटक

एका अल्पवयीन मुलाला हडपसर पोलीसांनी घेतले ताब्यात

किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर तीन ते चार जणांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच जवळील धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन हवेत फिरवून आमच्याशी कोणी पंगा घ्यायचा नाही, नाहीतर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत दहशत पसरवली. हा प्रकार ८ ऑगस्ट रोजी पुण्यातील फुरसुंगीमधील गंगानगर परिसरात घडला आहे. या प्रकरणी हडपसर पोलीसांनी तीन जणांना अटक केली आहे. एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

आकाश राजू गुजले (वय २३), अभयसिंग सिकंदरसिंग जुन्नी (वय १९) आणि पृथ्वीराज संतोष आव्हाड (वय १९, रा सर्व गंगानगर, फुरसुंगी) तसेच एक अल्पवयीन मुलगा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी वैभवी सागर साळुंखे (वय १९, धंदा नोकरी, रा. गंगानगर फुरसुंगी, हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आरोपी आकाश गुजले याने जुन्या भांडणाचा राग मनामध्ये धरून त्याच्या इतर आरोपी मित्रांसह फिर्यादी वैभवी यांच्या राहते घराजवळ गेले. आरोपी आकाश याच्याकडे धारदार शस्त्र होते व अभयसिंगजुनी याच्याकडे लोखंडी रोड होता. अभयसिंग जुनी याने लोखंडी रोडने पार्किंगमध्ये लावलेल्या ३ गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच आकाश व अभयसिंग जुनी यांनी फिर्यादी यांच्या पतीला शिवीगाळ करून हाताच्या चापटीने मारहाण केली.

एवढेच नाही तर आरोपी आकाशने त्याच्या जवळील धारदार शस्त्र हातामध्ये घेऊन हवेत फिरवले. आमच्याशी कोणी पंगा घ्यायचा नाही, नाहीतर जिवंत सोडणार नाही”, अशी धमकी दिली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात कलम ४२७, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादविस सह ४, २५ आर्म ॲक्टप्रमाणे दाखल करण्यात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच १ विधीसंघर्ष ग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest