गावठी दारु बनविणाऱ्या २३०१ जणांना अटक, ९ कोटी ३२ लाखाचा मुद्देमाल जप्त
ओंकार गोरे
गेल्या चार महिन्यात गावठी दारु, भेसळयुक्त मद्य, अवैध ताडीयासह अवैध मार्गाने बनावट अमली पदार्थ बनवणाऱ्या २ हजार ३०१ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ९ कोटी ३२ लाख ८४ हजार ९१९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या विविध पथकाने १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२३ या दरम्यान ही कारवाई केली आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाने केलेल्या कारवाईमध्ये पुणे जिल्हयामध्ये ०१ एप्रिल ते ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये अवैध मद्य निर्मिती, वाहतुक व विक्री गावठी दारु, भेसळयुक्त मद्य, अवैध ताडी, भेसळयुक्त ताडी, क्लोरेल हायड्रेटमिश्रीत ताडी बनावट मद्य, परराज्यातील मा ढाव्यांवरील गोवा बनावटीचे मद्य, बनावट मद्य, भेसळयुक्त अवैध मद्य, लेबल व बुचांचा वापर करुन विक्री होणारे माव विशेषत: हातभट्टी निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द एकुण १ हजार ५८३ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये १ हजार ५१६ आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून एकूण ५ कोटी ८१ लाख ३८ हजार ९०९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तर हातभट्टी दारु निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द पथकाने गेल्या चार महिन्यात हातभट्टी दारु निर्मिती, वाहतुक व विक्री विरुध्द प्रभावीपणे कारवाई करुन एकूण १००६ गुन्हे नोंदविले आहेत. त्यामध्ये ७८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३ कोटी ५९ लाख ४६ हजार ०१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गावठी दारु विक्री करणाऱ्या आरोपींविरोधात एम. पी. डी. ए अंतर्गत एकूण ३३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातील ०५ आरोपींविरोधात स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.
तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ९३ अन्वये गेल्या चार महिन्यात अवैध मद्य निर्मिता, बाह विक्री करणारे सराईत गुन्हेगारांविरोधात एकूण २२५ प्रस्ताव संबंधित दंडाधिकाऱ्याकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण ५६ बंधपत्र बेतलेल असून १३ लाख ४३ हजार रुपये किंमतीचे बंधपत्र घेण्यात आलेले आहे.
याशिवाय, महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६८ व ८४ नुसार अवैध मद्य विक्री करणाऱ्या विरु अवैध ठिकाणी मद्य सेवन करणाच्या ग्राहकांविरुद्धात ९७ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामधील आरोपींना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर १०२ आरोपींना दोषी ठरविण्यात आले. दोषी आणि गुन्ह्यांतील आरोपींकडून न्यायालयाने ३ लाख ५३ हजार ४०३ रुपये किमतीचा द्रव्य दंड ठोठविला आहे. यामुळे केवळ अध करणाऱ्या विरुध्दच कारवाई न करता त्यासोबत सदर ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या विरुद देखील कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या ग्राहकांना देखील चाप बसणार आहे.