विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा...

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या पालखी विठोबा मंदिर आणि जगद्‍गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मंगळवारी सकाळपासूनच रीघ लावली होती. पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असलेल्या भाविकांनी हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगावर ताल धरत आपला उत्साह टिकवून ठेवला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Mahendra Kolhe
  • Wed, 14 Jun 2023
  • 07:13 am
विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा...

विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी बोलावा...

महेंद्र कोल्हे 

feedback@civicmirror.in

TWEET@mahendrakolhe30

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या पालखी विठोबा मंदिर आणि जगद्‍गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मंगळवारी सकाळपासूनच रीघ लावली होती. पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असलेल्या भाविकांनी हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगावर ताल धरत आपला उत्साह टिकवून ठेवला होता.

या वारकऱ्यांच्या आदरातिथ्यासाठी शहरवासीयांनी देखील कसून तयारी केली होती. जागोजागी वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. त्याचाही अनेकांनी लाभ घेतला. वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सेवा दिली. तसेच, वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी अनेकांनी त्यांना मसाज आणि मालिश सेवा दिली.

वारकऱ्यांनी या मुक्कामाचे निमित्त साधत शहरात फेरफटका मारला. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर, सारसबागेतील गणपती मंदिर आदी मंदिरांमध्ये जात त्यांनी दर्शन घेतले. तसेच, शनिवारवाडा, लालमहाल, पर्वती, कात्रज येथील सर्पोद्यान आदी पर्यटन स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. शहरातील बाजारपेठांनाही भेट देत वारकऱ्यांनी आवश्यक साहित्याची खरेदी केली. यामुळे संपूर्ण शहराचे वातावरण भक्तिमय झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story