सवलतीचा मिळकतकर भरण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ

शेवटच्या दिवशी मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संकेतस्थळावर (वेबसाईट) गर्दी केलेली असतानाच वीजपुरवठा खंडित झाल्याने महापालिकेची सर्व्हर यंत्रणा कोलमडून पडली. मिळकत करात सवलतीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. मात्र, ऑनलाईन कर भरणा होऊ न शकल्याने महापालिकेने दोन दिवस म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 1 Aug 2023
  • 12:28 am
सवलतीचा मिळकतकर भरण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ

सवलतीचा मिळकतकर भरण्यासाठी दोन दिवस मुदतवाढ

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

शेवटच्या दिवशी मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संकेतस्थळावर (वेबसाईट) गर्दी केलेली असतानाच वीजपुरवठा खंडित झाल्याने महापालिकेची सर्व्हर यंत्रणा कोलमडून पडली. मिळकत करात सवलतीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. मात्र, ऑनलाईन कर भरणा होऊ न शकल्याने महापालिकेने दोन दिवस म्हणजे दोन ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

चालू आर्थिक वर्षातील मिळकतकर भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता.  अनेक मिळकतधारकांनी ऑनलाइन कर भरण्याचा प्रयत्न केला. ऑनलाइन यंत्रणा कोलमडल्याने मिळकतधारकांनी नागरी सुविधा केंद्रात गर्दी केली. त्यामुळे नागरी सुविधा केंद्रात मोठ्या रांगा लागल्या होत्या. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कामकाज ठप्प झाले.  

मुदतीमध्ये मिळकतकर भरणा-या मिळकतधारकांना सर्वसाधारण करात किमान पाच ते कमाल दहा टक्क्यांपर्यंतची सवलत दिली जाते. यंदा मिळकतकरातील चाळीस टक्क्यांची सवलत देण्याच्या निर्णयावरून गोंधळ झाला होता. त्यामुळे यंदा मिळकतकराची देयके विलंबाने पाठविण्यात आली. गेल्या वर्षी देखील शेवटच्या दिवशी  महापालिकेची ऑनलाईन यंत्रणा काेलमडली होती. त्यामुळे दोन दिवस मुदतवाढ देण्यात आलेली होती. यंदाही तोच प्रकार झाला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story