To the woman for promotion Demand for a bedmate : बढती देण्यासाठी महिलेकडे शय्यासोबतीची मागणी

बँकेतील महिला कर्मचाऱ्याला बढती देण्यासाठी तिच्याकडे अधिकाऱ्याने शय्यासोबत करण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Fri, 28 Jul 2023
  • 01:27 am
बढती देण्यासाठी महिलेकडे  शय्यासोबतीची मागणी

बढती देण्यासाठी महिलेकडे शय्यासोबतीची मागणी

बँकेतील अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

बँकेतील महिला कर्मचाऱ्याला बढती देण्यासाठी तिच्याकडे अधिकाऱ्याने शय्यासोबत करण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बुद्धभूषण गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो बँक ऑफ बडोदात क्रेडिट कार्ड विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही कॅम्प परिसरातील बँक ऑफ बडोदामधील क्रेडिट कार्ड विभागात काम करते. आरोपी गायकवाड हा फिर्यादीचा बॉस असून, तो फिर्यादी आणि इतर महिला कर्मचाऱ्यांनाही रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवायचा. या गोष्टीला विरोध करणाऱ्या महिला, मुलींना तो कामावरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. त्याने फिर्यादीसदेखील अश्लील शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.  

आरोपी पीडितेला म्हणाला की, प्रमोशन पाहिजे असेल, तर मोठ्या साहेबांसोबत शय्यासोबत करावी लागेल. एवढ्यावरच न थांबता त्याने कार्यालयातच पीडित महिलेशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचे कृत्य महिलेस लज्जा उत्पन्न करणारे होते. त्यानंतरही तो पीडितेला त्रास देतच होता. तिला पब ला चल, पार्टी दे अशी मागणीही तो करत होता. तसेच, ऑफिसमधील इतर महिलांशी अत्यंत वाईट वागत होता. 

जागतिक महिलादिनाच्या दिवशी एका महिलेला चपलेने मारण्याची धमकी त्याने दिली होती. याबाबत संबंधित महिलेने सर्वांसमक्ष वरिष्ठांकडे तोंडी तक्रारही केली होती. पीडिता एकटीच राहात असल्याचे आरोपीस माहिती होते. त्याचा गैरफायदा घेऊन तो नेहमी तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करत होता. या संपूर्ण प्रकरणानंतर फिर्यादीने पोलीस ठाणे गाठून बुद्धभूषणविरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story