मोदींना टिळक पुरस्कार? हे कसं शक्य आहे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मोदी यांच्या लोकशाही विरोधी धोरणांविरोधात काँग्रेस सतत्याने लढा देत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्याने मोदी यांना पुरस्कार देणे योग्य नाही, असा आक्षेप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याबाबतची जाहीर नाराजी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी स्वरूपात व्यक्त केली आहे.

मोदींना टिळक पुरस्कार?  हे कसं शक्य आहे ?

मोदींना टिळक पुरस्कार? हे कसं शक्य आहे ?

रोहित टिळक पदाधिकारी असतानाही पुरस्कार का?; पुणे शहर कॉँग्रेसचा विरोध

देवेंद्र शिरूरकर

devendra.shirurkar@civicmirror.in

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. मोदी यांच्या लोकशाही विरोधी धोरणांविरोधात काँग्रेस सतत्याने लढा देत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्याने मोदी यांना पुरस्कार देणे योग्य नाही, असा आक्षेप काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्याबाबतची जाहीर नाराजी काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी स्वरूपात व्यक्त केली आहे. त्यानंतर पटोले यांनीही मोदींना पुरस्कार देण्यास विरोध दर्शवला आहे.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त १ ऑगस्ट रोजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे होणाऱ्या कार्यक्रमात ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. दीपक टिळक यांच्या हस्ते मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे या वेळी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर असल्याने त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, काँग्रेसने मोदी यांना पुरस्कार देण्यास आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही विरोधी धोरणाविरोधात लढा देत आहेत. काँग्रेसचे विद्यमान प्रदेश सरचिटणीस आणि विद्यार्थी काँग्रेसचे माजी अध्यक्ष रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केल्याने शहरातील काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्याबाबतची नाराजी शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची जाहीर नाराजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे लेखी स्वरूपात कळवण्यात आली आहे, असे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ‘सीविक मिरर’ शी बोलताना सांगितले. काँग्रेसने विरोधाची भूमिका घेतल्यामुळे या पुरस्कार प्रदान सोहळ्यावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांनी यावरून मोदींची पाठराखण केली आहे, तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी भूमिका घेतली आहे. या विषयी प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, लोकमान्य टिळक हे जर आज जिवंत असते तर त्यांनाही मोदींना दिलेला पुरस्कार आवडला नसता. मोदींनी लोकशाहीविरोधात काम केले आहे आणि त्यांना टिळक पुरस्कार दिला जातो आहे.  काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. लोकमान्य टिळक संस्था काँग्रेस म्हणून कधी काम करत नाही. ती स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी काय करावे हे काँग्रेस ठरवत नाही. मोदींना पुरस्कार देण्यास हरकत काय आहे. राजकीय मतभेद असू शकतात पण एकत्र यायला काही हरकत नसावी. महाराष्ट्राची वैचारिक अधोगती होतेय हे खरे आहे. सरकारी कार्यक्रम असतील तर सर्व वाद बाजूला ठेवून एकत्रित यावे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे जगताप म्हणाले आहेत. राजकीय मतभेद असू शकतात पण, अशा कार्यक्रमाला त्याला एकत्र येण्यावर विरोध का असावा असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

एकीकडे काँग्रेसमधून मोदींना देण्यात येणाऱ्या या पुरस्काराला विरोध होत असताना काँग्रेसचे नेते विश्वजीत कदमांनी मात्र यावर वेगळी भूमिका घेतली आहे. हा पुरस्कार एका खासगी ट्रस्टकडून देण्यात येत आहे, 'देणाऱ्याने तो पुरस्कार दिला आणि घेणाऱ्याने तो घेतला' असे म्हणत विश्वजीत कदमांनी या पुरस्काराचे अप्रत्यक्षपणे समर्थन केल्याचे दिसते आहे.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीला १ ऑगस्ट १९८३ पासून करण्यात आली. एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी हा पुरस्कार एस. एम. जोशी, कॉम्रेड डांगे, इंदिरा गांधी, डॉ. मनमोहन सिंग, अटल बिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, राहुलकुमार बजाज, जी. माधवन नायर, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. शिवथाणू पिल्ले, माँटेकसिंग अहलुवालिया, डॉ. कोटा हरिनारायण, डॉ.के.सिवन, बाबा कल्याणी, सोनम वांगचुक, डॉ. सायरस पूनावाला यांच्यासह काही दिग्गजांना देण्यात आलेला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story