कुंडमळा धबधब्यात पडलेला तरुण बेपत्ताच

मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधब्यात शुक्रवारी ( ७ जुलै ) सायंकाळी ६ च्या सुमारास एक तरुण वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. २४ वर्षीय ओंकार बाळासाहेब गायकवाड (रा. पारनेर, जि. अहमदनगर) हा कुंडमळा धबधब्यात वाहून गेला. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ओंकारने त्याच्या मित्रांसोबत कुंडमळा ट्रेकिंग मोहिमेला सुरुवात केली होती.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 9 Jul 2023
  • 09:35 am
कुंडमळा धबधब्यात पडलेला तरुण बेपत्ताच

कुंडमळा धबधब्यात पडलेला तरुण बेपत्ताच

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

मावळ तालुक्यातील कुंडमळा धबधब्यात शुक्रवारी ( ७ जुलै ) सायंकाळी ६ च्या सुमारास एक तरुण वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  २४ वर्षीय ओंकार बाळासाहेब गायकवाड (रा. पारनेर, जि. अहमदनगर) हा कुंडमळा धबधब्यात वाहून गेला. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी ओंकारने त्याच्या मित्रांसोबत कुंडमळा ट्रेकिंग मोहिमेला सुरुवात केली होती. त्याचवेळी तो धबधब्यात कोसळला. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अद्याप तो सापडलेला नाही.

ओंकार बंधाऱ्यावरून चालत असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात कोसळला. त्या वेळी मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र, बंधाऱ्यातील वेगवान पाण्यामध्ये तो वाहून गेला. घटनेनंतर स्थानिक पोलीस, नागरिक आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथकाच्या साहाय्याने ओंकारचा शोध घेतला जात आहे. 

ओंकार पिंपरीमधील टाटा मोटर्समध्ये कामाला आहे. कुंडमळा येथे तो मित्रांसोबत फिरायला गेला होता. त्या वेळी निसर्गाचे अनेक फोटो त्याने काढले व चित्रीकरणही केले. त्यातील काही व्हीडीओ पाण्यात उतरूनदेखील काढले आहेत. मात्र, बंधाऱ्यावर पाण्याचा प्रवाह अधिक असलेल्या धोकादायक ठिकाणी गेल्याने तो वाहून गेला. 

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सावंत यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले की, “दक्षतेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी आम्ही धोक्याची चिन्हे दर्शवणारे सुमारे २५ होर्डिंग्ज लावले आहेत, तसेच तळेगाव आणि एमआयडीसी पोलिसांच्या प्रत्येकी तीन पोलिसांसह सहा पोलिसांचाही समावेश गस्त पथकात करण्यात आला आहे. पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढतो. नागरिकांनी काही दिवस अशा ठिकाणी जाणे टाळावे." 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story