लाकडी बॉक्समध्ये घालून मुलीला ‘टाकले’

पुणे जिल्ह्यातील मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण हा चिंताजनक विषय असून जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायतींमध्ये मुले-मुली लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर हजारी ९१२ पेक्षाही कमी आहे. स्त्री भ्रूण पोटात असतानाच मारण्याचे शास्त्रीय उपाय कमी की काय, म्हणून आता मुली जन्मल्यानंतरही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

लाकडी बॉक्समध्ये घालून मुलीला ‘टाकले’

लाकडी बॉक्समध्ये घालून मुलीला ‘टाकले’

कोरेगाव भिमात आईनेच ६ महिन्याच्या मुलीला रस्त्याच्या कडेला टाकून केला पोबारा, वाटसरूने वाचवले प्राण, पाठवले उपचारासाठी

राजेंद्र चोपडे 

rajendra.chopde@civicmirror.in

पुणे जिल्ह्यातील मुलींच्या संख्येचे घटते प्रमाण हा चिंताजनक विषय असून जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायतींमध्ये मुले-मुली लिंग गुणोत्तर प्रमाण हे दर हजारी ९१२ पेक्षाही कमी आहे. स्त्री भ्रूण पोटात असतानाच मारण्याचे शास्त्रीय उपाय कमी की काय, म्हणून आता मुली जन्मल्यानंतरही सुरक्षित नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

 शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीला पुणे नगर महामार्गाच्या बाजूला शंभर मीटर आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने कोरेगाव भीमा परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव भीमा परिसरातील फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार फॅब्रिकेशनसमोर मुलगी आढळल्याचे स्थानिक नागरिक अजय गव्हाणे आणि किरण गव्हाणे यांनी सांगितले. याबाबत शिक्रापूर पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांना कळवले. त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस नाईक अपेक्षा तावरे, पोलीस अंमलदार प्रताप कांबळे,  १०८ अँब्युलन्स, कर्मचारी आणि डॉक्टर पोळ तातडीने घटनास्थळी आले. त्यानंतर त्यांनी सहा महिन्यांच्या मुलीला ताब्यात घेतले.

या मुलीला पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर येथे पोलिसांच्या देखरेखीखाली पाठवण्यात आले. आईने दुपारच्या सुमारास रस्त्यावर या लहानग्या बाळाला टाकून ती पळून गेली असावी. ते बाळ मात्र थंडीत कुडकुडत आणि रडत होते. त्या चिमुकल्याला माश्यांचा देखील त्रास होत होता. त्यावेळी तेथून जाणारे किरण गव्हाणे यांना ते दिसले. त्यांनी पोलीस येईपर्यंत तब्बल पाऊण तास मुलीशेजारी बसून माश्या दूर केल्या. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. त्यांनी दाखवलेली माणुसकी ही नक्कीच कौतुकास पात्र आहे.

पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात म्हणाले, "आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले असून स्वतच्या आईने पोटच्या गोळ्याला असं रस्त्यावर टाकून सोडून जाणं, हे सर्वांच्या मनाला चटका लावणारं आहे. आम्ही आरोपी महिलेचा शोध घेत असून, प्रत्यक्षदर्शींची मदत घेत आहोत."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story