येरवडा मनोरुग्णालयात अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या एकाने मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १६ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मनोरुग्णालयातील चार परिचारिका आणि एका सुरक्षारक्षकाने पीडित मुलाच्या डाव्या हातात १८ सुया खुपसल्या असून त्याला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Tue, 4 Jul 2023
  • 06:21 am
येरवडा मनोरुग्णालयात अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार

येरवडा मनोरुग्णालयात अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या एकाने मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या १६ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. मनोरुग्णालयातील चार परिचारिका आणि एका सुरक्षारक्षकाने पीडित मुलाच्या डाव्या हातात १८ सुया खुपसल्या असून त्याला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार येरवडा मनोरुग्णालयात जूनमध्ये घडला.

पोलीस माहितीनुसार, खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल १६ वर्षीय आरोपीला खेड पोलिसांनी येरवडा बालनिरीक्षणगृहात ठेवले होते. तेथून ३० मे रोजी मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचारासाठी आलेल्या आरोपीने अल्पवयीन  मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. उपचारानंतर घरी गेल्यावर त्याची आई शाळेत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी कोल्हापूरला गेली.  तेथे डावा हात दुखत असल्याची सारखी तक्रार तो करू लागला. डॉक्टरांना तपासात हातावर १८ ठिकाणी सुयांनी टोचल्याने दिसून आले. त्यामुळे गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गाताडे तपास करीत आहेत. तक्रारीत मुलाच्या आईने म्हटले आहे की, मुलाला उपचारादरम्यान चार परिचारिका आणि एका  रक्षकांकडून इंजेक्शन्स देण्यात आली. आरोपीने पीडित मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. 

‘पीडित मुलाला गोळ्या देऊन उपचार केले, त्याला कोणतेही इंजेक्शन दिले गेले नाही. प्रत्येक रुग्णाची स्वतंत्र खोली असते. त्याच्या सुरक्षेसाठी कर्मचारी असतात. आम्हाला या घटनेची फारशी माहिती नाही. पोलिसांकडून पत्र प्राप्त झाले की आम्ही  सहकार्य करू, जर कोणी दोषी आढळले तर कारवाई होईल अशी माहिती मानसिक रुग्णालयाच्या अधीक्षक हरिनाक्षी गोसावी यांनी मिररशी बोलताना दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा श्रीकांत गाताडे यांनी पीडित मुलाला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्याचे सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story