'Saath Marenge' : ‘साथ मरेंगे’ला नकार, ‘साथ जियेंगे’ला होकार!

एकत्र जीवन जगण्याच्या आणाभाका घेणाऱ्या प्रेमी जोडप्याच्या लग्नात अडचण येत असल्याने दोघांनीही एकत्र आत्महत्या करून जगाचा निरोप घेण्याचा निर्णय प्रियकराने घेतला. मात्र आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देणाऱ्या प्रेयसीला एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय मान्य झाला नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Nitin Gangarde
  • Sun, 23 Jul 2023
  • 11:08 pm
‘साथ मरेंगे’ला नकार, ‘साथ जियेंगे’ला होकार!

‘साथ मरेंगे’ला नकार, ‘साथ जियेंगे’ला होकार!

लग्नातील अडचणीमुळे आयुष्य संपविण्याचा घेतला एकत्रित निर्णय, प्रेयसीचा दाबला गळा, केले स्वत:वर वार

नितीन गांगर्डे

nitin.gangarde@civicmirror.in

एकत्र जीवन जगण्याच्या आणाभाका घेणाऱ्या प्रेमी जोडप्याच्या लग्नात अडचण येत असल्याने दोघांनीही एकत्र आत्महत्या करून जगाचा निरोप घेण्याचा निर्णय प्रियकराने घेतला. मात्र आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देणाऱ्या प्रेयसीला एकत्र आयुष्य संपवण्याचा निर्णय मान्य झाला नाही. एकत्र आत्महत्या करण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी योगेश प्रभाकर थोरात याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

यातील आरोपी हा  प्रेयसी अल्पवयीन असताना दोघेही पळून गेले होते. काही काळ दोघेजण सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात राहात होते. त्यानंतर ते दोघेही पुणे शहरातील कोंढवा परिसरात राहायला आले. आरोपी योगेश प्रभाकर थोरात (वय २८) हा सातारा जिल्ह्यातील साकुर्डी येथील रहिवासी आहे. त्याची प्रेयसी आणि तो गावाकडे शेजारी शेजारी राहात होते. 

विवाहाशिवाय दोघे एकत्र राहात होते. मात्र त्यांच्या लग्नात अडचण आल्यामुळे दोघांनी  एकत्र  जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आयुष्य संपवण्याचा त्याने सारखा तगादा लावला. मात्र तरुणीने याला विरोध केला. यामुळे संतापलेल्या प्रियकराने राग येऊन तरुणीचा मोबाईल चार्जरच्या केबलने गळा आवळला. तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याने तरुणीने आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. 

तरुणीने नकार दिल्यानंतर आरोपीने  स्वतःच्या शरीरावर चाकूने वार करून आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. तू आत्महत्या केली नाही तर मी इमारतीच्या छतावरून खाली उडी मारून आत्महत्या करेन अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रेयसीने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. आरोपी थोरात हा चाकूचे वार केल्याने जखमी झाला आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

 आरोपी योगेश थोरात वाहनांवर चालक म्हणून काम करतो. मागील काही दिवसांपूर्वी आरोपी योगेश आणि तरुणी कोंढव्यातील गोकुळनगर भागात राहण्यासाठी आले होते. त्याने तरुणीला तू खालच्या जातीतील आहे. मला तुझा कंटाळा आला आहे, असे सांगत एकत्र आत्महत्या करू असे सांगत होता. 

तरुणीने आत्महत्या करण्यास नकार दिल्यानंतर त्याने मोबाइल चार्जरच्या वायरने गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने कशीबशी त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर आरोपीने पोटावर चाकूने वार केले. इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story