Yerawada : जलतरण तलावात बुडून ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पुण्यातील येरवडा येथे जलतरण तलावात बुडून ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना येरवड्यातील नागपूर चाळीजवळील विभागीय क्रीडा संकुलात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 22 May 2023
  • 10:14 am
जलतरण तलावात बुडून ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जलतरण तलावात बुडून मृत्यू

कुटुंबीयांसोबत गेले होते पोहण्यासाठी

 

पुण्यातील येरवडा येथे जलतरण तलावात बुडून ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटना येरवड्यातील नागपूर चाळीजवळील विभागीय क्रीडा संकुलात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

गिरीश संदीप सुतार (वय ३७) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गिरीश हे धानोरी येथील मुंजाबा वस्ती येथे राहणारे आहेत. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ते आपल्या कुटुंबीयांसोबत येरवडा येथील क्रीडा संकुलात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पोहताना गिऱीश अचानक बुडाले.

ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी गिरीष यांना पाण्याबाहेर काढले. त्यानंतर ताबडतोब रुग्णवाहिका बोलावून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणीदरम्यान गिरीष यांना मृत घोषीत केले. पुढील प्रक्रियेसाठी त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला होता.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest