Khadakwasla Assembly Constituency : खडकवासल्याचा कौल कोणाला?

शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३० टक्के मतदान झाले. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात दुपारी एकपर्यंत २९ टक्के मतदान झाले असून मतदानाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ कसबा मतदारसंघानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे. खडकवासल्यात यंदा सायंकाळी ५ पर्यंत ५१.५६ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

ग्रामीण भागात सकाळपासून उत्साह, शहरी भागात तुरळक गर्दी, मतदारांमध्ये खडकवासल्यात किती टक्के मतदान?

शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत ३० टक्के मतदान झाले. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात दुपारी एकपर्यंत २९ टक्के मतदान झाले असून मतदानाच्या टक्केवारीत हा मतदारसंघ कसबा मतदारसंघानंतर दुसऱ्या क्रमांकाचा ठरला आहे. खडकवासल्यात यंदा सायंकाळी ५ पर्यंत ५१.५६  टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या खडकवासला मतदारसंघात शहरी आणि महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ग्रामीण भागाचा समावेश आहे. या मतदारसंघात भाजपचे तीन वेळा आमदार असलेले भीमराव तापकीर यांच्यापुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे सचिन दोडके आणि मनसेचे मयुरेश वांजळे यांचे आव्हान आहे. राष्ट्रवादी आणि मनसेची या मतदारसंघात ताकद आहे. सकाळी मतदानाला प्रारंभ झाल्यानंतर वारजे, धनकवडी, आंबेगाव या शहरीभागाबरोबरच ग्रामीण भागातही मतदारांचा उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. 

सकाळच्या पहिल्या दोन तासांत ५.४४ टक्के मतदान झाले.त्यानंतर मतदानाचा वेग वाढण्यास सुरूवात झाली. अकरा वाजेपर्यंत ११.०५ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या दोन तासांत  म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत २९.०५ टक्के मतदानाची नोंद झाली. खडकवासला मतदारसंघात मनसेचे दिवंगत सोनेरी आमदार रमेश वांजळे यांचे चिरंजीव निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

मोठा भौगोलिक विस्तार असूनही मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची परंपरा या मतदारसंघाने यंदाच्या विधानसभा निवडणुकीही जपली आहे. त्यामुळे हा वाढता मतटक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसची येथे ताकद असली तरी शहरी भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मजबूत जाळे येथे आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक नेहमीच तुल्यबळ ठरली आहे. या निवडणुकीतही हेच चित्र दिसून येत आहे. 

खडकवासला मतदारसंघात ५ लाख ७६ हजार ५०५ मतदार आहेत. त्यामध्ये ३ लाख ३६ हजार ८४ पुरूष तर, २ लाख  ७२ हजार ७८० महिला मतदारांची संख्या आहे. तसेच ४१ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest