महिला दिन विशेष: पीएमपीएमएलतर्फे महिलांना दिवसभर मोफत बस सेवा

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गांवर महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी शहरातील १७ मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार असून,

संग्रहित छायाचित्र

महिलांसाठी १७ मार्गांवर मोफत सेवा; पिंपरी-चिंचवड शहरात केवळ पाचच मार्ग

पंकज खोले: 

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गांवर महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. ८ मार्च रोजी शहरातील १७ मार्गावर दिवसभर ही मोफत सेवा दिली जाणार असून, महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडसाठी केवळ पाच मार्गावर ही सेवा असल्याने या परिसरातील महिला प्रवासांनी नाराजी व्यक्त केली.

शहरात धावणाऱ्या पीएमपीएमएलमध्ये महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली असते. मात्र, महिलांसाठी स्वतंत्र बस धावण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली आहे.  या धकाधकीच्या जीवनात महिलांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी प्रशासनाकडून या सुविधा देण्यात येतात. वर्षाच्या प्रत्येक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील १७ विशेष बसमधून महिलांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पीएमपीला  पिंपरी-चिंचवड शहरातुन मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. एकूण महसुलापैकी निम्म्याहून अधिक महसूल या परिसराचा असतो. आकुर्डी ते मनपा भवन , मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव, निगडी ते मेगा पॉलिस हिंजवडी आणि भोसरी ते निगडी आणि चिखली ते डांगे चौक मात्र, महिलांसाठी केवळ चारच मार्गावर ही सेवा धावत आहे. त्यामुळे आणखी मार्ग वाढवावेत, अशी ही मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.

मोफत सेवा (कंसात मार्ग क्रमांक)

मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव (११), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते मनपा (३२२), निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी (३७२), भोसरी ते निगडी (३६७), चिखली ते डांगे चौक (३५५) यासह पुण्यातील स्वारगेट ते हडपसर (३०१), स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर (११७), शनिवारवाडा ते केशवनगर मुंढवा (१६९), कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन (९४), एनडीए गेट क्र.१० ते मनपा (८२), कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (२४), कात्रज ते कोथरूड डेपो (१०३), हडपसर ते वारजे माळवाडी (६४), भेकराईनगर ते मनपा (१११), हडपसर ते वाघोली (१६७), अप्पर डेपो ते शिवाजीनगर (१३) या बसचा समावेश आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाकडून ज्या मार्गावर महिला प्रवाशांचे प्रमाण अधिक असते, त्यानुसार हे मार्ग ठरवले आहेत. या मोफत बस सेवेचा वापर महिलांनी करावा.

-सतीश गव्हाणे,वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest