Murder : पत्नीचे अपहरण करून हत्या, मृतदेह लपविला उसाच्या शेतात...!

पत्नीचे अपहरण करून हत्या केली. हत्येनंतर पतीने मृतदेह उसात लपवल्याचा घक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील लोणारवाडी या गावात घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीसांनी नराधम पतीला अटक केली आहे.

 पत्नीचे अपहरण करून हत्या, मृतदेह लपविला उसाच्या शेतात...!

पत्नीचे अपहरण करून हत्या, मृतदेह लपविला उसाच्या शेतात...!

पोलिसांनी आवळल्या आरोपी पतीच्या मुसक्या

पत्नीचे अपहरण करून हत्या केली. हत्येनंतर पतीने मृतदेह उसात लपवल्याचा घक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील लोणारवाडी या गावात घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलीसांनी नराधम पतीला अटक केली आहे.

सुरेखा संतोष पवार असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर संतोष अहिर्या पवार (वय २८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पवार याच्यावर अपहरण करून खून करणे असे कलम लावण्यात आले आहे. याबाबत चांदेबाई नाहिराज भोसले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की पतीने आपल्याच पत्नीचे अपहरण केले. त्यानंतर तिचा हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह उसाच्या शेतात लपवून ठेवला आणि पती घटनास्थळावरून पसार झाला होता.

या प्रकरणी चांदेबाई यांनी दौंड पोलीसांत फिर्याद दिली. त्यानुसार, तपास करत असताना पोलीसांनी पतीच्या मुसक्या आवळल्या. पतीला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता आपणच खून केल्याची कबुली दिली. तसेच पत्नीचा मृतदेह दौंड तालुक्यातील लोणारवाडी या गावच्या हद्दीतील वाळुंजकर यांच्या मालकीच्या शेतजमिनीतील असलेल्या ऊसामध्ये लपून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर  दौंड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story