पुणे शहरात आज पाणीपुरवठा बंद राहणार

विविध जलशुद्धीकरण केंद्रांतील दुरुस्ती आणि इतर कामांमुळे गुरुवारी (दि. ४) पुणे शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Edited By Admin
  • Thu, 4 Jul 2024
  • 11:22 am
Pune news, pune city,  water supply shut off, water pune,  water treatment plants, pmc

संग्रहित छायाचित्र

विविध जलशुद्धीकरण केंद्रांतील दुरुस्ती आणि इतर कामांमुळे गुरुवारी (दि. ४) पुणे शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुद्धीकरण केंद्र ( ५०० एम.एल.डी.), जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर , पर्वती एचएलआर टाकी परिसर व पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती टॅंकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परिसर व भामा आसखेड जॅक्वेल येथील विद्युत, पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याकारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठील गुरुवारी (दि.४) पूर्ण दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि. ५) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती जलकेंद्र अंतर्गत पाणीपुरवठा बंद असणारा भाग : पर्वती एमएलआर टाकी परिसर :  गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ आदी.  

पर्वती आयटीएलआर टाकी परिसर : सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग १ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळके वस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर सर्व्हे नं ४२ ते ४६ (कोंढवा खुर्द) आदी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परिसर, धनकवडी परिसर, आदी पर्वती एलएलआर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परकसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर , राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग : संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी. टी. कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया , वानवडी , जगताप चौक परिसर , जांभूळकर मळा, काळेपडळ , हंडेवाडी रोड , महंमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु., शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, आदी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर , एसएनडीटी (एमएलआर)

चतु:श्रुंगी टाकी परिसर : गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ, लॉ कॉलेज रोड, महाबळेश्वर हॉटेलपर्यंत बाणेर रोड, बीएमसीसी कॉलेज रोड, आयसीएस कॉलनी भोसलेनगर, सेनापती बापट रोड, भांडारकर रोड, प्रभात रोड, चतु:श्रुंगी टाकीवरुन पाणीपुरवठा होणारा बाधित भाग, पौड रोड, शिला विहार कॉलनी, अद्वैत सोसायटी भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी परिसर झोनिंग पध्दतीने, सहवास, क्षिप्रा, मनोहन सोसायटी विठ्ठल मंदिर परिसर झोननिंग करून, गोसावी वस्ती परिसर, करिष्मा सोसायटी समोरील परिसर, बकग बजार परिसर, बंधन सोसायटी परिसर, डी. पी. रस्ता (पार्ट), मयूर कॉलनी परिसर, डी. पी. रस्त्याची डावी बाजू, कर्वेरोड झाला सोसायटी ते शिवाजी पुतळ्यापर्यंतचा भाग, दशभूजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत म्हात्रे पुलापर्यंत एचए कॉलनी टिळेकर प्लॉट, भरतनगर अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदीर, सुनिता, युको बँक कॉलनी, टैंकर पॉईट डि.पी. रस्ता मंगेशकर हॉस्पिटल , हिमाली सोसायटी, वकीलनगर इत्यादी, करिष्मा सोसायटी ते वारजेवार्ड ऑफिस गिरीजा शंकर, नवसह्याद्री ताथवडे उद्यान परिसर निलकमल युनायटेड वेस्टर्न अनुरेखा स्थैर्य, मधूचय, शैलेश, अलंकार, मनीषा , स्वस्तिश्री, रघुकुल महिम्न, सुखा जयशक्ती सविता सोसा, विठ्ठल मंदिर रस्त्यापर्यंत, म्हाडा कॉलनी, नेहरूनगर वसाहत, पाळंदे कुरियर, राहुलनगर, प्रीतमनगर आदी.

वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी .

भामा आसखेड जलकेंद्र परिसर : लोहगाव, विमाननगर , वडगाव शेरी, कल्याणीनगर,  विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा आदी.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest