लोणावळा रेल्वे स्थानकावर ट्रॅफिक ब्लॉक, चार लोकल गाड्या रद्द

पुणे ते लोणावळा या दरम्यान धावणाऱ्या चार लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्ये रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 27 Jun 2023
  • 03:02 pm
लोणावळा रेल्वे स्थानकावर ट्रॅफिक ब्लॉक, चार लोकल गाड्या रद्द

लोणावळा रेल्वे स्थानकावर ट्रॅफिक ब्लॉक, चार लोकल गाड्या रद्द

पुणे ते लोणावळा धावणाऱ्या चार गाड्या रद्द

लोणावळा रेल्वे स्टेशनवर ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये विविध टेक्निकल/ तांत्रिक कामे केली जाणार आहेत. हा ट्रॅफिक ब्लॉक २७ जून ते २९ पर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे ते लोणावळा या दरम्यान धावणाऱ्या चार लोकल रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्ये रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

लोणावळा ते पुणे रेल्वे स्थानकादरम्यान करण्यात येणाऱ्या विविध कामांमुळे २७ जून ते २९ जून पर्यंत पुण्यावरुन लोणावळा करीता सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांनी रवाना होणारी लोकल संख्या ०१५६२ ही गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी रवाना होणारी लोकल संख्या ०१५६४ अणि लोणावळावरून पुण्याकरीता दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी रवाना होणारी लोकल संख्या ०१५६१ तसेच लोणावळावरून शिवाजीनगर करीता दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी रवाना होणारी लोकल संख्या ०१५६३ या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest