सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक जण जखमी

सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात अनेक तरुण-तरुणी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे, गडावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 04:41 pm
सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक जण जखमी

सिंहगडावरील पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, अनेक जण जखमी

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पुन्हा एकदा मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच सिंहगडावर गर्दी झाली होती. अशातच सिंहगडावरील टिळक बंगल्याजवळ असलेल्या तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. यात अनेक तरुण-तरुणी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे, गडावर येणाऱ्या पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सिंहगडावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. गाडी तळापासून पुणे दरवाजापर्यंत आणि गडावरील पायवाटांवर दाटीवाटीने पर्यटक चालत होते. सकाळपासून सातत्याने या परिसरात मधमाशा घोंगावत होत्या. मात्र मोठ्या प्रमाणात गडावर गर्दी झाल्यामुळे तोफेच्या पॉईंट परिसरात अनेक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. पर्यटकांच्या सुरक्षेबाबत वन विभागाने योग्य खबरदारी घेतली नसल्याचा आरोप पर्यटकांनी केला. या घटनेनंतर वनविभागाचे दोन अधिकारी किल्यावर निरीक्षणासाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच किल्ल्याच्या पायथ्याशी एक रुग्णवाहिनी उभी करण्यात आली.

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सिंहगड किल्ल्याला भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांना त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, किल्ल्याला भेट देताना पर्यटकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण मधमाशीच्या डंकांमुळे अनेकदा गंभीर ऍलर्जी होऊ शकते. त्रासदायक मधमाश्या टाळण्याची तसेच प्रतिबंधित ठिकाणे टाळण्याची शिफारस केली जाते. मधमाशी चावण्याच्या कोणत्याही घटना घडल्यास, पर्यटकांना योग्य औषधे घ्यावीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधवा.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest