खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात होणार वाढ

पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे अडीज टक्के टोलवाढ करण्यात येणार आहे. ही नवीन टोल दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे सातारा टोल रोड प्रशासनाकडून देण्यात आली.

संग्रहित छायाचित्र

महेंद्र शिंदे
पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावरील (Khed Shivapur Toll) टोलच्या दरात सुमारे अडीज टक्के टोलवाढ करण्यात येणार आहे. ही नवीन टोल दरवाढ 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे सातारा टोल रोड प्रशासनाकडून देण्यात आली. 

दरवर्षी एप्रिल महिन्यात टोलचे दर बदलले जातात.  त्यानुसार यावर्षीही टोलचे दर एप्रिलपासून बदलले जाणार आहे. यावर्षी पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावरील टोलच्या दरात सुमारे अडीज टक्के टोलवाढ करण्यात आली आहे. 

कार, जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ झाली असून नवीन दरानुसार या वाहनांना 120 रुपये टोल द्यावा लागणार आहे. हलक्या व्यावसायिक वाहनांच्या टोलच्या दरातही 5 रुपयांची वाढ झाली आहे. या वाहनांना आता 190 रुपये टोल आकारला जाणार आहे. 

बस आणि ट्रकसाठी पूर्वी 390 रुपये टोल दर होता. त्यात 10 रुपयांची वाढ झाली असून आता बस आणि ट्रकसाठी 400 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

जड वाहनांसाठी पूर्वी 415 रुपये टोल होता. आता त्यात 5 रुपयांची वाढ झाली असून जड वाहनांना आता 420 रुपये टोल द्यावा लागणार आहे. अवजड वाहनांच्या टोल दरात 15 रुपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार अवजड वाहनांसाठी 630 रुपये टोल आकारण्यात येणार आहे.

याबाबत पुणे-सातारा टोल रोडचे व्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "दरवर्षी टोलचे दर बदलत असतात. त्यानुसार यावर्षीही एप्रिलपासून टोल दर बदलले असून टोल दरात सुमारे अडीज टक्के वाढ झालेली आहे."

स्थानिक नागरीकांच्या वाहनासाठी असलेल्या मासिक पासच्या रकमेतही 10 रूपयांची वाढ झाली आहे. नव्या टोल दरानुसार स्थानिकांना आता 340 रूपयांचा मासिक पास घ्यावा लागणार आहे, असे टोल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest