जगातील सर्वात मोठा बोगदा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर, जुलै २०२४ ला होणार खुला !

या मार्गावर जगातील सर्वात मोठा बोगदा बांधण्यात येत आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ बऱ्याच अंशी कमी होणार आहे. या बोगद्याचे ५० टक्क्यापेक्षा अधिक काम पुर्ण झाले आहे. जुलै २०२४ पर्यंत बोगदा प्रवाशांसाठी खुला करण्याची शक्यता आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 22 Jun 2023
  • 04:23 pm
Pune-Mumbai Expressway : जगातील सर्वात मोठा बोगदा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर होणार !

जगातील सर्वात मोठा बोगदा पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर होणार !

प्रवाशांना सुमारे अर्धातास वेळ वाचणार

मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. सध्या एमएसआरडीसीने मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली ते कुसगाव अशी १९.८० किमीची नवीन मार्गिका (मिसिंग लेन) बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या मार्गावर जगातील सर्वात मोठा बोगदा बांधण्यात येत आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ बऱ्याच अंशी कमी होणार आहे. या बोगद्याचे ५० टक्क्यापेक्षा अधिक काम पुर्ण झाले आहे. जुलै २०२४ पर्यंत बोगदा प्रवाशांसाठी खुला करण्याची शक्यता आहे.

यात एकूण दोन बोगदे बांधण्यात येणार असून एक बोगदा १.७५ किमी लांबीचा आणि दुसरा ८.९३ किमी लांबीचा असेल. लांबीच्या बाबतीत हे दोन्ही बोगदे भारतातील सर्वात जास्त लांब बोगाद्यांपैकी असतील. यासह रुंदीच्या बाबतीतही ते आशियातील सर्व बोगद्यांना मागे टाकतील. तब्बल २३ मीटर रुंदीचे हे दोन्ही बोगदे भारतासह आशियातील सर्वात रुंद बोगदे असतील. यामध्ये एकूण चार मार्गिका असतील.

या दोन्ही बोगद्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे. द्रुतगती मार्गावरील खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट हे अंतर १९ किमीवरून १३.३ किमी इतके कमी होणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवासात सुमारे अर्धा तासाची बचत होणार आहे.

या बोगद्याला एक्स्प्रेस वेशी जोडण्यासाठी केबल-स्टेड ब्रिज बांधण्यात येत आहे. त्याच्या महाकाय खांबांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि द्रुतगती मार्ग दोन आणि चार लेन एकत्र धावतात. परंतु आडोशी बोगद्यापासून खंडाळा टोकापर्यंतच्या एक्स्प्रेस वेवर सध्या सर्वाधिक रहदारी असते. बोगाद्यानंतर या रहदारीपासून लोकांना दिलासा मिळणार आहे. यासोबतच या भागात दरड कोसळून अनेक अपघात झाले आहेत, त्याबाबतही दिलासा मिळणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest