‘जरा देख के चलो’ चे खरे हिरो!
ओश्विन कढव
‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हाती घेतलेला ‘जरा देख के चलो’ हा आगळा-वेगळा उपक्रम आता अंतिम टप्प्यात येऊ पाहात आहे. यामुळे नि:स्वार्थी भावनेने या उपक्रमाला पाठिंबा देणाऱ्या मात्र, प्रसिद्धीचा झोत जाणीवपूर्वक टाळणाऱ्या खऱ्या हिरोंची म्हणजे नायकांची ओळख करून घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे म्हणावे लागेल. सर्व नायकांच्या नशिबात सन्मानाचे क्षण येतातच असे नाही, असे म्हटले जाते. आमच्या उपक्रमातील स्वयंसेवक हे त्याचे आदर्श उदाहरण म्हणता येईल. टीम सेलेबिलिटीने आम्हाला जमेल त्या मार्गाने मुक्तहस्ताने पाठिंबा दिला. विक्री-तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या सेलेबिलिटीने उपक्रमाचे धोरण ठरविण्यापासून त्याची अंमलबजावणी करण्यात कधीही माघार घेतली नाही. वाहतूक पोलिसांना त्यांच्या कामात मदत करण्यापासून नागरिकांमध्ये वाहतुकीबाबतची जाणीव तयार करण्याच्या कामी त्यांच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठासमोरील आनंद ऋषी महाराज चौक, मुंढव्यातील द वेस्टिन चौक, बालेवाडीतील हाय स्ट्रीट सह अनेक चौकात जातीने भाग घेतला.
कॅम्पेनचे टी-शर्ट घातलेले आणि हातात वाहतूकविषयक नियम असलेले फलक घेतलेल्या या स्वयंसेवकांनी कोणीही सिग्नल मोडणार नाही किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार नाही, याकडे जातीने लक्ष दिले.
सेलेबिलिटीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखालील स्वयंसेवकांनी तळपत्या दुपारी आणि घामाघुम करणाऱ्या सायंकाळी वर्दळीच्या चौकात तासनतास अथक कष्ट घेतले. यामागे त्यांचा उद्देश होता तो प्रत्येकासाठी पुणे अधिक चांगले शहर बनवण्याचा. घरी परतताना त्यांच्याकडे होता एक वेगळा अनुभव आणि वाहतूक सुलभ, चांगले बनवण्यासाठी मदतीचे आश्वासन.
पुण्याच्या खऱ्या हिरोंची ओळख करून घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे. ‘जरा देख के चलो’ उपक्रमात भाग घेणाऱ्या आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी वर्षभर अखंड स्वयंसेवेने काम करणाऱ्या पुण्याच्या खऱ्या हिरोंना म्हणजे नायकांना सेलेबिलिटी सलाम करते, त्यांना मानवंदना देते. व्यावसायिक सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून सेलेबिलिटीने हा उपक्रम उत्साहाने हाती घेतला आहे.