जीवदान देणारी रुग्णवाहिकाच उलटली, बस अपघातातील जखमींना घेवून जात होती रुग्णालयात

पुणे जिल्ह्यातील ओझर आणि लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची खासगी बस उलटून अपघात झाला. यात अपघातात पाच महिलांसह एकूण ९ प्रवाशी जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात घेवून जाणारी रुग्णावाहिका देखील उलटली. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी ८ च्या सुमारास घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 22 May 2023
  • 03:38 pm
जीवदान देणारी रुग्णवाहिकाच उलटली

संग्रहित छायाचित्र

ओझर आणि लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या बसचा झाला होता अपघात

पुणे जिल्ह्यातील ओझर आणि लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची खासगी बस उलटून अपघात झाला. यात अपघातात पाच महिलांसह एकूण ९ प्रवाशी जखमी झाले. धक्कादायक बाब म्हणजे जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात घेवून जाणारी रुग्णावाहिका देखील उलटली. ही घटना रविवारी (दि. २१) सकाळी ८ च्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी काही भाविक एका खासगी बसने ओझर आणि लेण्याद्री गणपतीच्या दर्शनासाठी जात होते. खुटवड येथील फुलगाव शिवारात येताच भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे शेतातून गेलेल्या रोडलगतच्या खड्ड्यात बसचे चाक गेल्यामुळे बस उलटली. या अपघातात पाच महिला गंभीर तर इतर ५ प्रवाशी किरकोळ असे एकूण  ९ भाविक जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळाताच रुग्णावाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अपघातातील जखमींना रुग्णालयात घेवून जाण्यासाठी ५ जखमी महिलांना घेवून रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने निघाली होती. मात्र, फुलगाव ते तुळापूर रोडवर रुग्णवाहिकाही उलटली. या अपघातात पाचही महिलांना किरकोळ दुखापत झाली.

या प्रकरणी चित्रा खरे (वय ४८, रा. पेपर गल्ली, पुणे) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीसांनी रुग्णवाहिकेचे चालक आणि खासगी बसचे चालक यांच्या विरोधात कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मो. वा. का. क. १८४, ११९/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest