बिबट्याने केली थेट कुत्र्याची शिकार, खेड तालुक्यात भितीचे वातावरण

कोळेकर वस्ती येथील घरा समोरून बिबट्याने थेट कुत्र्याला ओढून नेले आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 6 Jul 2023
  • 05:19 pm
बिबट्याने केली थेट कुत्र्याची शिकार, खेड तालुक्यात भितीचे वातावरण

बिबट्याने केली थेट कुत्र्याची शिकार, खेड तालुक्यात भितीचे वातावरण

सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. श्री क्षेत्र भानोबाची कोयाळी गावात बिबट्याची दहशतीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाली आहे. कोळेकर वस्ती येथील घरा समोरून बिबट्याने थेट कुत्र्याला ओढून नेले आहे. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.

कोयाळी गावातील संतोष आणि भानुदास इंगळे यांच्या घरासमोरील अंगणात घडला प्रकार घडला आहे. या व्हिडीओत तीन कुत्रे आणि बिबट्यांची खडाजंगी दिसत आहे. तीन कुत्रे आणि बिबटे एकमेकांवर भिडलेले दिसत आहे. त्यात काही वेळाने थेट बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याला तोंडात धरुन कुत्र्याची शिकार केल्याचे दिसत आहे.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने लवकर पावले उचलण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest