येरवडा कारागृहातील कैद्यांची हाती आता स्मार्ट फोन, महिन्यातून ३ वेळा साधता येणार संवाद

येरवडा कारागृहातील कैद्यांना स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधणे अधिक सोईस्कर झाले आहे. कारागृहात कैद्यांसाठी प्रायोगित तत्वावर स्माट कार्ड फोन सुविधआ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारागृहातील बहुतांशी कॉईन बॉक्स बंद पडल्याने स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 23 Jun 2023
  • 04:26 pm
येरवडा कारागृहातील कैद्यांची हाती आता स्मार्ट फोन

येरवडा कारागृहातील कैद्यांची हाती आता स्मार्ट फोन

बहुतांश कॉईन बॉक्स बंद पडल्याने स्मार्टफोनचा करण्यात आला शुभारंभ

येरवडा कारागृहातील कैद्यांना स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधणे अधिक सोईस्कर झाले आहे. कारागृहात कैद्यांसाठी प्रायोगित तत्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कारागृहातील बहुतांशी कॉईन बॉक्स बंद पडल्याने स्मार्ट कार्ड फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज (शुक्रवारी) या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे.

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कारागृह व सुधारसेवा) सन्माननीय अमिताभ गुप्ता साहेब यांच्या संकल्पनेतुन या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. कारागृहात एकूण ४० स्मार्ट कार्ड फोन लावण्यात आले आहे. यामुळे बंद्यांचा नातेवाईकांशी तसेच वकिलांशी सुसंवाद झाल्याने कारागृहातील बंद्यांचा मानसिक ताण-तणाव कमी होऊन कारागृह सुरक्षेचा प्रश्न काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे, यामुळे बंद्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होईल.

सद्यस्थितीत बंद्यांकरीता नातेवाइकांशी संपर्क करण्याकरीता कॉइन बॉक्स सुविधा आहे. परंतु सदरचे कॉईन बॉक्स सद्यस्थितीत बाजारात उपलब्ध नाहीत आणि हे कॉईन बॉक्स नादुरूस्त झाल्यास सहजासहजी दुरूस्ती ही करून मिळत नाही. यामुळे बहुतांशी ही सुविधा बंद झाली होती. तसेच ज्या बंद्यांना अति सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड व विभक्त कोठड्यांमधील बंद्यांनाही नातेवाइकांशी संपर्क करण्यासाठी कॉईन बॉक्स ज्या ठिकाणी बसविण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी न्यावे लागत असल्याने सदरची बाब ही कारागृह सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते.

या बाबींचा विचार करून राज्यातील काही कारागृह अधिक्षकांनी कॉईन बॉक्सऐवजी साधे मोबाइल फोन वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे केली होती. यावर अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी देखील स्मार्ट कार्ड फोन सुविधा येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनास केली होती. सदर प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने देखील मान्यता दिलेली आहे.

अॅलन ग्रुप, एल- ६९ मणिकंपलयन हाऊसिंग युनिट, इरोड, तमिळनाडू यांच्या मार्फत पुरविण्यात येणारी Inmate Calling Sytem आजपासून बंद्यांकरीता उपलब्ध झालेली आहे. सदरची सुविधा कारागृहातील बंद्यांना पात्रतेनुसार महिन्यातुन ३ वेळा १० मिनिटांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामुळे बंद्यांना स्वतःच्या कुटुंबाशी संपर्क साधणे अधिक सोईस्कर झालेले आहे. दरम्यान, येरवडा कारागृहातील या सुविधेचा आढावा घेऊन राज्यातील इतर कारागृहामध्ये देखील याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. भविष्यामध्ये स्मार्ट कार्ड फोन सुविधामध्ये आणखी सुधारणा करून पात्रतेसंदर्भात शिथीलता आणण्याचा देखील विचार करण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest