'बेकायदा' प्रवासी वाहतुकीची डोकेदुखी
पुण्यातून मुंबईसारख्या विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची बेकायदा वाहतूक केली जाते. खासगी वाहनचालक महामार्गांवर उभे राहून सीटप्रमाणे पैसे घेतात आणि प्रवाशांना नेतात. यामध्ये कोणत्याही प्रकारे सुरक्षेची हमी नसते. तरीदेखील नागरिक जीव धोक्यात घालून अशा प्रकारे प्रवास करतात. नवले पूल, चांदणी चौक, वाकड अशा ठिकाणी रस्त्यात मध्येच खासगी वाहनचालक उभे राहतात. यामुळे वाहतूक कोंडी होत असून, अपघात होण्याचा धोकाही वाढतो आहे. बेकायदा प्रवासी वाहतुकीची ही वाढती डोकेदुखी प्रशासनाने बंद करण्यी तीव्र गरज आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.