संग्रहित छायाचित्र
कंपाला : आफ्रिकन देश युगांडात ३०० हून अधिक लोकांना डिंगा डिंगा विषाणूची लागण झाली आहे. यामध्ये बहुतांश महिला व मुली आहेत. युगांडातील बुंदीबाग्यो जिल्ह्यात या गूढ आजाराचा सर्वात मोठा परिणाम दिसून आला आहे.वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा रुग्णाला या विषाणूची लागण होते तेव्हा त्याच्या शरीरात तीव्र थरकाप सुरू होतो. हा थरकाप इतका तीव्र असतो की रुग्ण नाचत असल्यासारखे दिसते. संसर्ग गंभीर असल्यास, रुग्णाला अर्धांगवायू देखील होऊ शकतो.
बुंदीबाग्यो जिल्हा आरोग्य अधिकारी कियिता क्रिस्टोफर यांच्या मते, हा विषाणू पहिल्यांदा २०२३ मध्ये आढळला होता. तेव्हापासून युगांडा सरकार याची पडताळणी करत आहे. युगांडाच्या आरोग्य विभागाने अद्याप डिंगा विषाणूमुळे झालेल्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. विभागाने लोकांना वेळेवर औषधे घेण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांना संसर्ग झाला आहे त्यांना बुंदीबागी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अहवालानुसार, या आजारापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत कोणतीही लस उपलब्ध नाही. आरोग्य अधिकारी कियाता यांच्या म्हणण्यानुसार, संक्रमित लोकांवर अँटीबायोटिक्स देऊन उपचार केले जात आहेत. यातून सावरण्यासाठी एक आठवडा लागणार आहे.
कियिता यांनी हर्बल औषधे विषाणूवर उपचार करण्यासाठी कुचकामी असल्याचे वर्णन केले आहे आणि लोकांना चाचणी आणि उपचारांसाठी रुग्णालयात येण्यास सांगितले आहे. कियिता म्हणाल्या,आजपर्यंत हर्बल औषधांनी रोग बरा होऊ शकतो असा कोणताही वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही. जिल्हा आरोग्य विभागाच्या पथकाने दिलेली औषधे नागरिकांनी घ्यावीत.
हा आजार टाळण्यासाठी आरोग्य विभागाने लोकांना स्वच्छ राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांना कोणत्याही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येण्यास मनाई करण्यात आली आहे. डॉ कियिता म्हणाले की, बुंदीबुग्यो व्यतिरिक्त, इतर कोणत्याही जिल्ह्यात विषाणूची प्रकरणे आढळली नाहीत.
यासोबतच अनेक संशयितांचे नमुने आरोग्य मंत्रालयाच्या टीमकडे पाठवण्यात आले आहेत. हे नमुने तपासणे बाकी आहे. या आजाराची तुलना १५१८ मध्ये फ्रान्समध्ये पसरलेल्या 'डान्सिंग प्लेग'शी केली जात आहे. लोकांना या आजाराची लागण होऊन बरेच दिवस थरथर कापायचे. सततच्या थरथर कापल्याने येणाऱ्या थकव्यामुळे अनेक वेळा लोकांचा मृत्यूही झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.