पहिली कार्गो विशेष गाडी खडकी येथून रवाना, रेल्वेला किती महसूल मिळणार?

पुणे रेल्वे विभागातील खडकी स्थानकावरून पहिली कार्गो विशेष गाडी गुरूवार (दि. २१ जून) संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या गाडीला १४ व्हीपीयू कोच असून त्यात ९०% व्हाइट गुड्स आहे. ज्यात एसी, फ्रीज, टीव्ही इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. ज्यांचे एकूण वजन ३२२ टन आहे. यामुळे रेल्वेला पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 24 Jun 2023
  • 05:48 pm
पहिली कार्गो विशेष गाडी खडकी येथून रवाना

पहिली कार्गो विशेष गाडी खडकी येथून रवाना

पुणे रेल्वे विभागातील खडकी स्थानकावरून पहिली कार्गो विशेष गाडी गुरूवार (दि. २१ जून)   संकरेल-हावडा येथे रवाना करण्यात आली. या गाडीला १४ व्हीपीयू कोच असून त्यात ९०% व्हाइट गुड्स आहे. ज्यात एसी, फ्रीज, टीव्ही इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे. ज्यांचे एकूण वजन ३२२ टन आहे. यामुळे रेल्वेला पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे.

पुणे रेल्वे विभागाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. परंतु पुण्यातून रेल्वेने तुरळक संख्येने पार्सल पाठवले जायचे जे गंतव्य ठिकाणी जाणाऱ्या गाडीला व्हीपीयू कोच लावून पाठवले जायचे. पार्सलद्वारे महसूल वाढवण्यासाठी विभागीय बिझनेस डेव्हलपमेंट युनिट टीम विविध कंपन्यांशी चर्चा करून सातत्याने प्रयत्नरत होती. टीमच्या प्रयत्नांच्या फलस्वरुप पहिली कार्गो विशेष गाडी खडकी येथून रवाना करण्यात आली.

पुणे रेल्वे विभागाच्या वाणिज्य आणि परिचालन विभागाने  स्थापन केलेले बिझनेस डेव्हलपमेंट  युनिट विविध नवीन गंतव्यस्थाने आणि ग्राहक शोधण्यासाठी संयुक्त प्रयत्न करत असते. विभागाद्वारे नियमितपणे राष्ट्रीय स्तरावर ऑटोमोबाईल, साखर, पेट्रोलियम इत्यादी उत्पादनांसह विविध वस्तूंची वाहतूक केली जाते. मालगाड्यांची सुरळीत वाहतूक करून देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये आवश्यक वस्तूंचे वितरण सुनिश्चित केले जाते.

बीडीयू टीमच्या प्रयत्नांमुळे पूर्वी रस्त्याने पाठवले जाणारे सामान रेल्वे मार्गावर वळवण्यात यश आले आहे. पुणे रेल्वे विभागावर दरमहा ७-८ पार्सल रेक लोड होण्याची अपेक्षा आहे व यामुळे दरमहा १.१२ कोटी रुपये महसूल प्राप्त होऊ शकेल. दरम्यान, यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ मंडल परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिट टीमच्या सक्रिय प्रयत्नांमुळे व किफायतशीर दर, सुरक्षित परिचालन इत्यादी वैशिष्ट्यांमुळे विभाग नवीन व्यवसाय मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest