सफाई कर्मचारी पडला पार्किंगच्या १५ फूट खोल खड्ड्यात, अग्निशमन दलाकडून जीवदान

इमारतीच्या तलमजल्यावर पार्किंगसाठी केलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात तोल गेल्याने सफाई कर्मचारी पडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सहकारनगर येथील ज्ञानदिप सोसायटीत घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 23 Jun 2023
  • 05:09 pm
सफाई कर्मचारी पडला पार्किंगच्या १५ फूट खोल खड्ड्यात

सफाई कर्मचारी पडला पार्किंगच्या १५ फूट खोल खड्ड्यात

तोल गेल्याने इमारतीच्या तळमजल्यावरील पार्किंगच्या खड्यात पडला कर्मचारी

इमारतीच्या तलमजल्यावर पार्किंगसाठी केलेल्या सुमारे १५ फूट खोल खड्ड्यात तोल गेल्याने सफाई कर्मचारी पडल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील सहकारनगर येथील ज्ञानदिप सोसायटीत घडली. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या जवानांनी कर्मचाऱ्याला सुखरूप बाहेर काढले आहे.

तुकाराम देठे (वय ६०, रा. चव्हाण नगर, पुणे) असे सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेत तुकाराम देठे हे जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगरमधील ज्ञानदिप सोसायटीत तळमजल्यावर हायड्रोलिक पार्किंगसाठी सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. तुकाराम देठे हे आज (शुक्रवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास साफसफाई करत होते.

साफसफाई करत असताना तुकाराम यांचा तोल गेला. त्यामुळे ते १५ फूट खोल खड्यात पडले. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सफाई कर्मचाऱ्याला बाहेर काढले. मात्र, यात कर्मचाऱ्याच्या हाताला आणि पायाला मार लागल्याने ते जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest