पुणे ते बिकानेर विशेष साप्ताहिक रेल्वे धावणार !

पुणे ते बिकानेर दरम्यान नवीन साप्ताहिक रेल्वे सुरू होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानला जोडण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. साप्ताहिक पहिली रेल्वे ३० मे रोजी पुण्याहून रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांना बिकानेरला पोहोचेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 29 May 2023
  • 03:22 pm
पुणे ते बिकानेर विशेष साप्ताहिक रेल्वे धावणार !

पुणे ते बिकानेर विशेष साप्ताहिक रेल्वे धावणार !

पुण्यावरून दर मंगळवारी आणि बिकानेरवरून दर सोमवारी रेल्वे धावणार

पुणे ते बिकानेर दरम्यान नवीन साप्ताहिक रेल्वे (Special weekly train ) सुरू होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानला जोडण्यासाठी रेल्वे विभागाने हा निर्णय घेतला आहे. साप्ताहिक पहिली रेल्वे ३० मे रोजी पुण्याहून रात्री ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांना बिकानेरला पोहोचेल.

गाडी क्रमांक २०४७६ साप्ताहिक विशेष ६ जून २०२३ पासून दर मंगळवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी बिकानेरला पोहोचेल. तर गाडी क्रमांक २०४७५ साप्ताहिक विशेष ५ जूनपासून दर सोमवारी सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी बीकानेरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल.

या रेल्वेला लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद, मेहसाणा, पालनपूर, अबू रोड, जावई बंद, फलना, राणी, मारवाड जंक्शन, पाली, लुनी, जोधपूर, गोरान, मेर्टा रोड, नागौर आणि नोखा असे थांबे असतील. यात एकूण २० कोच डब्बे असून त्यात २ एसी, २-टायर, ५ एसी ३-टियर, ७ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन, असे डब्बे असतील.

प्रवाशांनी या रेल्वेचा आणि रेल्वेतील सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच प्रवास करताना रेल्वेचे आणि कोरोनाचे नियम पाळावेत आणि आपला प्रवास सुरक्षित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल विभागाकडून करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest