पुणे ते झाशी २६ साप्ताहित विशेष रेल्वे गाड्या धावणार !

पुणे ते झाशी दरम्यान २६ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये तर गुरूवारी पुण्यावरून तर दर बुधवारी झाशीवरून रेल्वे रवाना होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 29 Jun 2023
  • 12:05 pm

संग्रहित छायाचित्र

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय

पुणे ते झाशी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते झाशी दरम्यान २६ साप्ताहिक सुपरफास्ट स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये तर गुरूवारी पुण्यावरून तर दर बुधवारी झाशीवरून रेल्वे रवाना होणार आहे.

यामध्ये गाडी क्रमांक ०१९२१ ही रेल्वे गाडी ६ जूलैपासून २८ सप्टेंबरपर्यंत दर गुरूवारी दर गुरुवार दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी पुणे स्थानकावरून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी झाशी येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक ०१९२३ ही रेल्वे गाडी ५ जुलैपासून २७ सप्टेंबरपर्यंत दर बुधवारी झाशी येथून दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११ वाजून ३५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.

या रेल्वे गाड्यांना दौंड दोरमार्ग, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, नर्मदापुरम, भोपाळ, विदिशा, बिना आणि ललितपूर असे थांबे असणार आहेत. यामध्ये ०१ द्रुतीय वातानुकूलित, ०५ तृतीय वातानुकूलित, ०५ शयनयान, ०४ जनरल सेकंड क्लास आणि ०२ लगत कम गार्ड ब्रेक व्हॅन्सन असे डब्बे असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी या रेल्वे गाड्यांचा उपयोग घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest