जावई भला, तोवर भला...

मागच्या काही दिवसांपासून पुण्याच्या गुन्हेगारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच कौटुंबिक कलह आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. खडकीत एका घरजावयाला घरात राहू नको, असे सांगितले म्हणून जावयाने आक्रमक होत सासूच्या अंगावर उकळते पाणी फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्पूर्वी सासूला जावयाने जबरदस्त मारहाण केली आहे. दरम्यान पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 25 May 2023
  • 03:48 pm
जावई भला, तोवर भला...

जावई भला, तोवर भला...

घराबाहेर काढल्याचा राग अनावर झाल्याने घरजावयाने सासूच्या अंगावर फेकले उकळते पाणी, तत्पूर्वी मारहाण करत पाडले दात

#खडकी

मागच्या काही दिवसांपासून पुण्याच्या गुन्हेगारीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच कौटुंबिक कलह आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. खडकीत एका घरजावयाला घरात राहू नको, असे सांगितले म्हणून जावयाने आक्रमक होत सासूच्या अंगावर उकळते पाणी फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्पूर्वी सासूला जावयाने जबरदस्त मारहाण केली आहे. दरम्यान पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सुजाता शिंदे या खडकीतील दारुगोळा कारखान्यात कामाला आहेत. त्यांची मुलगी आणि जावई महेंद्र तोरणे त्यांच्याकडेच राहतात, त्यांचा जावयाशी काही कारणांमुळे वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला आणि जावयाने आक्रमक होत सासूच्या अंगावर गरम पाणी फेकले आणि सासूला जबर मारहाण केली. 

या मारहाणीत सुजाता शिंदे जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुजाता शिंदे यांनी या संदर्भात खडकी पोलिसांकडे तोरणेच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षांपासून सुजाता शिंदे, त्यांची मुलगी आणि जावई महेंद्र सिद्धनाथ तोरणे  तिघेही खडकी परिसरात राहात होते. सासू, मुलगी आणि जावई एकाच घरात राहात असल्याने घरात सतत काहीना काही कुरबुरी सुरू असायच्या. मात्र अनेकदा सुजाता शिंदे यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यातच वाद वाढत गेले आणि शिंदे यांनी थेट तोरणेला घराबाहेर निघून जाण्यास सांगितले. याचा त्याला राग आला आणि त्याने शिंदेंचे डोके फरशीवर आपटले. या सगळ्या मारहाणीत सासूचे दातही पडले. त्यानंतर त्यांच्या अंगावर थेट गरम पाणी ओतले.  

मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यात अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शुल्लक कारणावरून घरामध्ये होणाऱ्या वादांमुळे अनेकदा टोकाचे पाऊल उचलले गेल्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. रोज नव्या तक्रारी समोर येत आहेत. पुण्यात रोज नव्या घटना समोर येतात. त्यात कधी हल्ले तर, कधी कोयता गँगच्या दहशतीमुळे पुणेकर हैराण झाले आहेत. अनेक परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही सगळी दहशत रोखण्यासाठी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलिसांकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest