पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्वरदा बापट यांना उमेदवारी ?

भाजपचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशातच गिरीष बापट यांच्या सुन स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, आपल्याला उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती स्वरदा बापट यांनी दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 17 May 2023
  • 05:42 pm
पुणे पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून श्रद्धा बापट यांना उमेदवारी ?

श्रद्धा बापट

उमेदवारी बाबत पक्षासोबत अद्याप कोणतीही चर्चा नाही – श्रद्धा बापट

भाजपचे दिवंगत खासदार गिरीष बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या जागेवर लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशातच गिरीष बापट यांच्या सुन स्वरदा बापट यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र, आपल्याला उमेदवारी देण्याबाबत पक्षाने अद्याप कोणतीही चर्चा केली नसल्याची माहिती स्वरदा बापट यांनी दिली आहे.

स्वरदा बापट सिविक मिररशी बोलताना म्हणाल्या की, पोटनिवडणुकीसंदर्भात जी काही चर्चा आहे, त्यावर पक्षाकडून अजून काही निर्णय झाला नाही. याबाबत विचारणाही झालेली नाही. उमेदवार ठरवण्याचा निर्णय पक्षाचा आहे आणि तो आम्हाला मान्य असेल. बापट साहेबांचे खुप मोठे काम आहे. शेवटच्या दिवसापर्यंत बापट साहेबांनी काम केले. हे पुण्याच्या जनतेला ठाऊक आहे. त्यामुळे पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी तो निवडून येणारच. बापट साहेबांनी जेवढे काम केले तेवढे आम्ही करू, आम्ही कितीही काम केले तरी ते कमी पडेल. परंतु पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी तो विकास कामांच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहू, असे स्वरदा बापट म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या की, भाजपच्या वरिष्ठ लोकांसोबत आमचे पारिवारीक संबंध आहेत. त्यामुळे भाजपचे बरेच नेते आम्हाला भेटून गेले. मात्र, निवडणूकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचा परिवार आहे, हे आम्ही सुरूवातीपासून सांगतो. त्यामुळे भाजप आमच्या सोबत आहे हा संदेश देण्यासाठी भाजपचे नेते आम्हाला भेटून गेले. बापट साहेबांनी विविध भागात विकास कामे केली आहेत. परंतू, अद्यापही ५० पेक्षा अधिक विकास कामांचे उद्घाटन बाकी आहे, त्यामुळे बापट साहेबांचे स्वप्न आम्ही पुर्ण करू, असेही स्वरदा बापट यांनी सिविक मिररशी बोलताना सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest