‘रस्ता सुरक्षा, अपघात घटवण्यास प्राधान्य’ - पुण्याच्या पहिल्या महिला आरटीओ अधिकारी अर्चना गायकवाड यांचे प्रतिपादन

गेल्या काही दिवसांत पुण्यातील अपघात वाढत असून ही चिंतेची बाब आहे. सामान्यांना सुरक्षितपणे प्रवास करता आला पाहिजे. त्यासाठी रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत अपघात घटण्यावर भर राहणार असल्याची माहिती पुण्याच्या नव्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 15 Jun 2024
  • 03:25 pm
Archana Gaikwad

संग्रहित छायाचित्र

गेल्या काही दिवसांत पुण्यातील अपघात वाढत असून ही चिंतेची बाब आहे. सामान्यांना सुरक्षितपणे प्रवास करता आला पाहिजे. त्यासाठी रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत अपघात घटण्यावर भर राहणार असल्याची माहिती पुण्याच्या नव्या प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड (Archana Gaikwad) यांनी दिली.

अर्चना गायकवाड यांनी शुक्रवारी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. पुणे आरटीओ कार्यालयाच्या पहिल्या महिला अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. तसेच अपघाताचे प्रमाणही जास्त आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध स्तरांवर काम करावे लागणार आहे. त्या दृष्टीने लवकरच उपाययोजना आखल्या जातील, असे त्या म्हणाल्या. 

स्कूल बस रडारवर 
लवकरच शाळा सुरू होत आहेत. शालेय विद्यार्थी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी स्कूल बस तपासणी सुरू होत आहे. मोहिमेत केवळ गाड्यांची कागदपत्रे तपासणी एवढ्या पुरती मर्यादित न राहता गाड्यांची स्थितीही तपासली जाणार आहे. स्कूल बसची स्थिती योग्य नसल्यास तत्काळ कारवाई केली जाणार आहे. वायुवेग पथकाला याचे आदेश दिले जातील, असेही त्या म्हणाल्या.

पुणे आरटीओ कार्यालयाकडे १० इंटरसेप्टर वाहने आहेत. त्याच्या माध्यमातून वायुवेग पथक विविध ठिकाणी कारवाई करेल. सुरक्षित रस्ते प्रवासाला प्राधान्य असणार आहे.
- अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

(First Female RTO of Pune Archana Gaikwad)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest