पीएमपीएमएलकडून स्वारगेट आणि मार्केटयार्डहून १० मार्ग पूर्ववत सुरू

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोथरूड डेपो येथून मुळशी तालुका परिसरात संचलनात असलेले १० बस मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वारगेट आणि मार्केटयार्ड येथून सुमारे १० बसेस धावणार आहेत. ही बससेवा गुरुवारी म्हणजेच १५ जूनपासून सुरू होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 14 Jun 2023
  • 04:21 pm
पीएमपीएमएलकडून स्वारगेट आणि मार्केटयार्डहून १० मार्ग पूर्ववत सुरू

पीएमपीएमएलकडून स्वारगेट आणि मार्केटयार्डहून १० मार्ग पूर्ववत सुरू

१५ जूनपासून सुरू होणार १० मार्गावरील बस

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून कोथरूड डेपो येथून मुळशी तालुका परिसरात संचलनात असलेले १० बस मार्ग पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये स्वारगेट आणि मार्केटयार्ड येथून सुमारे १० बसेस धावणार आहेत. ही बससेवा गुरुवारी म्हणजेच १५ जूनपासून सुरू होणार आहे. काही दिवसांपुर्वीच या मार्गांवरील बसेस बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रवाशांची मागणी वाढल्याने पीएमपीएमएलने १० मार्ग पुर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

पूर्ववत सुरू करण्यात आलेले बसमार्ग खालीलप्रमाणे

  • मार्केटयार्ड ते घोटावडेगांव / मुगावडे :- स्वारगेट, डेक्कन कॉर्नर, कोथरूड डेपो मार्गे धावेल.
  • मार्केटयार्ड ते मालेगांव (शेडाणी फाटा) :- स्वारगेट, कोथरूड डेपो, पौडगांव, मालेगांवमार्गे धावेल.
  • मार्केटयार्ड ते उरावडेगांव (मारणेवाडी) :- कोथरूड डेपो, भूगांव, उरावडेगांवमार्गे धावेल.
  • मार्केटयार्ड ते खारावडे (लव्हार्डेगांव) :- पिरंगुट, उरावडेगांव, मुठामार्गे धावेल.
  • स्वारगेट ते काशिंगगांव कमान :- डेक्कन कॉर्नर, पौडगांव, कोळवणगांवमार्गे धावेल.
  • स्वारगेट ते बेलावडे :- कोथरूड डेपो, पौडगांव, कोंढावळेमार्गे धावले.
  • मार्केटयार्ड ते पौडगांव शासकीय वसतिगृह :- स्वारगेट, कोथरूड डेपो, भूगांव, घोटावडे फाटामार्गे धावेल.
  • मार्केटयार्ड ते कोळवणगांव :- स्वारगेट, कोथरूड डेपो, दारवली, डोंगरगांवमार्गे धावले.
  • स्वारगेट ते भादसगांव :- स्वारगेट, कोथरूड डेपो, भूगांव, पौडगांव, रावडेवाडीमार्गे धावेल.
  • मार्केटयार्ड ते खांबोली (कातरखडक) :- कोथरूड डेपो, पिरंगुट, रिहेफाटा, खांबोलीमार्गे धावेल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest