पुण्यात विक्रमी पाऊस, २४ तासांत ११४.१ मिमी

गुरुवारी शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली. ११४.१ मिलिमीटर पाऊस हा शहराच्या इतिहासातील जुलैच्या एकाच दिवशी झालेला तिसरा सर्वाधिक मोठा पाऊस ठरला. बुधवार सकाळ ते गुरुवार सकाळी या २४ तासांत ११४.१ मिमी पावसाची नोंद झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 26 Jul 2024
  • 12:48 pm
Pune Rains, Pune Rain Record, Pune Rainfall Record

संग्रहित छायाचित्र

जुलैमध्ये एका दिवशी झालेला तिसरा सर्वाधिक पाऊस

गुरुवारी शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली. ११४.१ मिलिमीटर पाऊस हा शहराच्या इतिहासातील जुलैच्या एकाच दिवशी झालेला तिसरा सर्वाधिक मोठा पाऊस ठरला. बुधवार सकाळ ते गुरुवार सकाळी या २४ तासांत ११४.१ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी १९ जुलै १९५८ मध्ये जुलैच्या एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस झाला. त्यावेळी १३०.४ मिमी पाऊस झाला होता. त्यानंतर २७ जुलै १९६७ ला ११७.९ मिमी हा दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस झाला. अलीकडील काही वर्षांमध्ये जुलैमध्ये पावसाने ओढ दिल्याचे दिसते. मात्र, २०२४ वर्ष त्याला अपवाद ठरले. गुरुवारचा पाऊस २००७ नंतर म्हणजे १७ वर्षांनी जुलैमधील सर्वोच्च पाऊस होय.

हवामान खातेही पाण्यात
जोरदार पावसामुळे शिवाजीनगरमधील हवामान खात्याच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साठले. हवामान विभागाने  घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शहरी भागात अधून मधून जोरदार पावसाचा अंदाज होता. मात्र, पावसाने या अंदाजावर पाणी फिरवले शिवाजीनगर, नगर रोड, मंडई भागात मेट्रोचे काम सुरू असल्याने जागोजागी पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. सिमला ऑफिस परिसरातही पाणी तुंबले.

जुलैमधील विक्रमी पाऊस

दिनांक              पाऊस

१९ जुलै १९५८ - १३०.४ मिमी

२७ जुलै १९६७ - ११७.९ मिमी

२५ जुलै २०२४ - ११४.१ मिमी

३ जुलै २००७ - ९५.२ मिमी

१५ जुलै २००९ - ९३.७ मिमी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest