चतुःशृंगीच्या यात्रेत रंगला आजीबाईंचा भोंडला
पुणे : ऐलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल लाव ग सुने आणि वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या अशी भोंडल्याची गाणी म्हणत निवारा वृध्दाश्रमातील आजींनी आपल्या गत आठवणींना उजाळा दिला.
चतुःशृंगी देवस्थान ट्रस्ट आणि गोखलेनगरमधील सुयोग मित्र मंडळाने आयोजित केलेल्या 'आजीबाईचा भोंडला' या सामाजिक उपक्रमाचे निमित्त होते.
'निवारा' वृध्दाश्रमातील पन्नासहून अधिक महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. महिलांनी भोंडल्यांबरोबर फेर धरले, फुगड्याही घातल्या. वृध्दाश्रमात जीवन असलेल्या महिलांच्या बालपणीच्या स्मृतींना उजाळा मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्षा खामकर, कल्पना भवारी, सुंदर चौधरी, सुनिता मांडवकर, नंदा मोहिते, पल्लवी शर्मा यांनी संयोजन केले. महिला गृह उद्योग लिज्जत पापड उद्योग समुहाचे विशेष सहकार्य मिळाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.