संग्रहित छायाचित्र
पुणे : पर्वती एम. एल. आर. टाकीच्या हरकानगर भवानी पेठ येथील नलिकेवर ४५० मि.मी बटरफ्लाय व्हॉल्व बसविणे व हरकानगर भवानी पेठ येथे समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत ३०० मि.मी व्यासाची नलिका ५०० मि.मी नलिकेस जोडणे करिता गुरुवारी (२६ डिसेंबर) उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (२७ डिसेंबर) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भागः
पर्वती MLR टाकी परिसर शंकर शेठ रोड परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीज मागील परिसर, पर्वती दर्शनचा काही भाग, मित्रमंडळ कॉलनीचा काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंद नगर, महर्षि नगर चा काही भाग, TMV कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी, इ.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.