बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या तब्बल १६ हजार जागा रिक्त

दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असला तरी जागा वाढूनही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. तीन फेऱ्या संपल्यानंतर केवळ २७ हजार ५०० प्रवेश झाले आहेत. संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवूनदेखील तब्बल १६ हजार १५१ जागा रिक्त आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दीड महिन्यांपासून खोळंबलेल्या औषधनिर्माणशास्त्र पदवी (बी.फार्मसी) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचा तिढा सुटला असला तरी जागा वाढूनही विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. तीन फेऱ्या संपल्यानंतर केवळ २७ हजार ५०० प्रवेश झाले आहेत. संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवूनदेखील तब्बल १६ हजार १५१ जागा रिक्त आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने तसेच नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांसंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाले नाहीत. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. पारंपरिक आणि काही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे पहिले सत्र संपल्यानंतर औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या प्रवेश फेरीची सुरूवात झाली. ही फेरी २३ डिसेंबरपर्यंत सुरू होती.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पदविका आणि पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे ६० टक्के जागांवर प्रवेश देण्यात आले. पदवी अभ्यासक्रमांसाठी तब्बल ५० हजार ६१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २१ हजार ९१७ विद्यार्थ्यांनी दोन फेऱ्यांत प्रवेशही घेतले. ६ डिसेंबरपासून तिसऱ्या प्रवेश फेरीची सुरुवात झाली. या फेरीला १६ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. तीन फेऱ्यांपर्यंत ४३ हजार ५५१ जागा रिक्त होत्या. त्यापैकी आतापर्यंत २७ हजार ५०० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. आता संस्थास्तरावर १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत प्रवेश झाले. या फेरीनंतरदेखील १६ हजार १५१ जागा रिक्त आहेत.

पालक प्रतिनिधी संदीप पाटील म्हणाले, ‘‘ज्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळाले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचा पर्याय खुला असतो. परंतु, राज्यसरकार निवडणुकांमध्ये गुंतून पडले. नवीन महाविद्यालये आणि तुकड्यांचा निर्णय घेतला गेला नाही. परिणामी लाखो विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. परिणामी तब्बल १६ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.’’

नामांकित महाविद्यालयाचे प्राचार्य नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, ‘‘एमबीबीएस, बीडीएस आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांचा पर्याय असतो. परंतु दुर्दैवाने यंदाच्या वर्षी इतिहासातील सर्वात कमी म्हणजे तब्बल ४० टक्के जागा रिक्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आमची मागणी आहे की, विधी अभ्यासक्रमांसाठीच्या धर्तीवर औषधनिर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रियेवर फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण असावे.’’

शैक्षणिक वर्ष कोलमडले

प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष कोलमडले आहे. फार्मसी अभ्यासक्रमाच्या इतर वर्षातील नोव्हेंबर-डिसेंबर सत्र परीक्षांचे अनेक विद्यापीठाचे वेळापत्रक जाहीर झाले. परंतु अद्याप प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रियाच अपूर्ण आहे. त्यामुळे विद्यापीठांना आता या प्रक्रियेत प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest