राज्याच नविन सत्ता येताच राज्यात अनेक बदल करण्यात येत आहेत. अशातच, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे पालिकासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. पुणे महापालिकेचे विभाजन करावे लागेल असं पाटलांनी वक्तव्य केल्यामुळं पुण्यातील राजकारणाला आता नवं वळण मिळणार आहे. पाटलांच्या या वक्तव्याला आता कोणा कोणाचा पाठिंबा असणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलं आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे शहरातील नवनिर्वाचित आमदार व मंत्र्यांसोबत वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पुण्याच्या पालिकासंदर्भात आपलं मत व्यक्त केलं.
महापालिकेचे विभाजन होणे गरजेचे आहे. मात्र, त्यात राजकीय सामाजिक, भौगोलिक असे अनेक विषय गुंतलेले आहेत. त्यामुळे यावर व्यापक चर्चा अपेक्षित आहे. नावांचा प्रश्न अशा वेळी अतिशय महत्त्वाचा ठरतो. त्यातही पुणे नावाला इतिहास आहे. त्यामुळे पुणे नावाचा समावेश असलाच पाहिजे, याबाबत सगळेच आग्रही असणार. अशा अनेक गोष्टींचा साधकबाधक चर्चा झाल्यानंतरच महापालिकेच्या विभाजनाचा निर्णय होईल असं पाटील यावेळी म्हणाले.
तसेच यासोबत पुण्याचा दादा कोण? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी हा जटिल प्रश्न आहे, असे उत्तर दिले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डोके सुपीक आहे. २३७ इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच आमदार आहेत, त्यांनी बरोबर मंत्रिमंडळ तयार केले. आता हाही प्रश्न ते समाधानकारक पद्धतीने निकाली काढतील, असे पाटील म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.