संग्रहित छायाचित्र
ऐन थंडीच्या महिन्यात पुण्यासह 16 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकीकडे देशातील उत्तरेकडील राज्यात थंडीची तीव्र लाट पसरली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यातील थंडीची लाट ओसरली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवसांत राज्यातील काही ठिकाणी वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दोन आठवड्यापूर्वी थंडीची लाट पाहायला मिळत होती. पण, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.
हवामान विभागाने राज्यात 16 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे. तसेच, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अमरावती, बुलढाणा, गोंदिया नागपूर, वर्धा, वाशिम या ठिकाणीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.