पुणे विद्यापीठाने २९ जून रोजी होणाऱ्या सर्व परिक्षा ढकलल्या पुढे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) २९ जून रोजी होणार्‍या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी साजरा होणार्‍या दोन महत्त्वाच्या सणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आणि आषाढी एकादशी हे सण २९ जून रोजी साजरे केले जाणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 27 Jun 2023
  • 11:58 am
 पुणे विद्यापीठाने २९ जून रोजी होणाऱ्या सर्व परिक्षा ढकलल्या पुढे

पुणे विद्यापीठाने २९ जून रोजी होणाऱ्या सर्व परिक्षा ढकलल्या पुढे

९ जुलै रोजी होणार सर्व परिक्षा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU) २९ जून रोजी होणार्‍या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच दिवशी साजरा होणार्‍या दोन महत्त्वाच्या सणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बकरी ईद आणि आषाढी एकादशी हे सण २९ जून रोजी साजरे केले जाणार आहेत.

विद्यापीठाने जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात म्हटले आहे की, २०२३ च्या उन्हाळ्याच्या परीक्षा ६ जूनपासून सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, २९ जून रोजी होणाऱ्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही परिक्षा २९ जूनऐवजी ९ जुलै रोजी ठरलेल्या वेळेतच घेण्यात येईल.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांनी २९ जुलै रोजीची परिक्षा ९ जुलै रोजी घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या सर्व संलग्नीत महाविद्यालयातील (अहमदनगर, नाशिक व पुणे) परीक्षा संस्थगित करुन त्यांचे पुर्न: आयोजन करावे, अशा सुचना देखील परिपत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest