नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारली

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १० मे रोजी संवाद साधणार होते. मात्र, नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 8 May 2023
  • 05:00 pm

नाना पटोलेंच्या कार्यक्रमाला पुणे विद्यापीठाने परवानगी नाकारली

परवानगीसाठी विद्यार्थी आक्रमक

पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्या धर्तीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले १० मे रोजी संवाद साधणार होते. मात्र, नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थी प्रचंड आक्रमक झाले आहेत.

विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्या शैक्षणिक अडीअडचणीवरती, वसहतीगृह, मेसचा दर्जा, नवीन शैक्षणिक धोरण अशा विषयावरती नाना पटोले १० रोजी संवाद साधणार होते. यासंदर्भात ३ मे रोजी कुलसचिवांना लेखी पत्रही दिले होते. मात्र, अध्यापही प्रशासनाने नाना पटोले यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिलेली नाही.

याबाबत विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरुंशी संवाद साधल्यानंतर १० मे रोजी जी-20 परिषद असल्यामुळे नाना पटोले यांच्या कार्यक्रमला परवानगी मिळणार नाही असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे. परंतु याबाबत कोणतेही लेखी निवेदन प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही. त्यामुळे, विद्यार्थीच्या चर्चांसाठी विद्यापीठ प्रशासन परवानगी देत नसेल तर आम्ही कार्यक्रम घेण्यावरती ठाम आहोत, असा आक्रमक पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest