पुणे विद्यापीठाकडून सेट परीक्षेचा निकाल जाहीर, अवघे ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र

केवळ ६ हजार ६७६ म्हणजेच ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात ३ हजार ५७० विद्यार्थी, ३ हजार १०४ विद्यार्थीनी आणि २ तृतीयपंथी असे एकूण ६ हजार ६७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 28 Jun 2023
  • 11:24 am
 set exam : सेट परीक्षेचा निकाल जाहीर, अवघे ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र

सेट परीक्षेचा निकाल जाहीर, अवघे ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र

दोन दिवस आधीच फुटला होता विद्यापीठाकडून निकाल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या सेट (M-SET) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत केवळ ६ हजार ६७६ म्हणजेच ६.५९ टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यात ३ हजार ५७० विद्यार्थी, ३ हजार १०४ विद्यार्थीनी आणि २ तृतीयपंथी असे एकूण ६ हजार ६७६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र आणि गोव्यातून ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली होती. यामध्ये एकूण १ लाख १९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख एक हजार २५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये १७ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यातील दोन विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी पुणे केंद्रातून १९ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १५ हजार ७०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एकूण ७१ विषयांसाठी ही परीक्षा झाली होती.

दरम्यान, २६ मार्च २०२३ रोजी ही परीक्षा पार पडली. बुधवारी या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच सोमवारी (दि. २६) दुपारी पाच नंतर अनेक विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर परीक्षेचा निकालाचे मेल आल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात होते. अखेर मंगळवारी विद्यापीठाने अधिकृत निकाल जाहीर केला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest