पुणे : दुमजली घराचे छत कोसळले, एकाचा मृत्यू

पुणे कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 27 Jun 2023
  • 10:39 am
दुमजली घराचे छत कोसळले, एकाचा मृत्यू

दुमजली घराचे छत कोसळले, एकाचा मृत्यू

एक जण जखमी, रुग्णालयात केले दाखल

पुणे कॅम्प परिसरातील दुमजली घराचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास पुणे कॅम्प परिसरातील ८३० दस्तुर मेहेर रोड येथे घडली.

स्टॅनली डिसोझा (वय ५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर जेरी डिसोझा (वय ६०) हे वृद्ध जखमी झाले आहेत. जखमी आजोबाला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ८३० दस्तुर मेहेर रोड येथे असलेल्या दुमजली घराचे छत कोसळले. घटनेची माहिती मिळाताच पुणे कॅन्टोन्मेंट आणि पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करत आजोबाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, स्टॅनलीला वाचवण्यात अपयश आले. दरम्यान, छत कोसळण्याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेचा तपास सुरू आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest