पुणे : संचेती चौकातील भुयारी मार्गामधील पावसाळी वाहिनी फुटली, वाहतुक बंद

पुण्यातील शिवाजीनगर वाहतूक विभागाअंतर्गत सिमला ऑफिस चौक ते शिवाजीनगर कोर्ट दरम्यान मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र, या कामादरम्यान शिवाजीनगर कोर्टासमोर असलेली संचेती चौकातील भुयारी मार्गावरील पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 4 Jul 2023
  • 04:07 pm
संचेती चौकातील भुयारी मार्गामधील पावसाळी वाहिनी फुटली

संचेती चौकातील भुयारी मार्गामधील पावसाळी वाहिनी फुटली

रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत वाहतुक राहणार बंद

पुण्यातील शिवाजीनगर वाहतूक विभागाअंतर्गत सिमला ऑफिस चौक ते शिवाजीनगर कोर्ट दरम्यान मेट्रोचे काम सुरु आहे. मात्र, या कामादरम्यान शिवाजीनगर कोर्टासमोर असलेली संचेती चौकातील भुयारी मार्गावरील पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

शिवाजीनगर भागातील संचेती चौकात असलेल्या भुयारी मार्गात पावसाळी पाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्गातील वाहतूक दररोज रात्री अकरा ते सकाळी सहा यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.


संचेतील चौकातील भुयारी मार्गावरील वाहतुक बंद
!

 पर्यायी मार्ग :

>>संचेती चौक - इंजिनिअरींग कॉलेज चौक, आर. टी. ओ. चौकातून इच्छितस्थळी

>>संचेती चौक - उजवीकडे वळून स. गो. बर्वे चौक - छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातून इच्छितस्थळी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest