पुणे: ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखीसाठी ‘खाकी वर्दी’ सज्ज; पाच हजार पोलिसांचा फौजफाटा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची राहणार नजर

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पाळख्या रविवारी (३० जून) पुणे शहरात दाखल होणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होत असते.

संग्रहित छायाचित्र

पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पाळख्या रविवारी (३० जून) पुणे शहरात दाखल होणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होत असते. अनेकजन या वारीमध्ये पायी चालण्यासाठी सहभागी होत असतात. या सोहळ्यासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार असून ठिकठिकाणी मनोरे देखील उभे केले जाणार आहेत. तसेच, पालखी सोहळ्यातील गर्दीत चोरटे भाविकांकडील मौल्यवान ऐवज चोरतात. सोनसाखळी चोरी, मोबाइल चोरी सारखे प्रकार देखील घडतात. त्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी गुन्हे शाखेची पोलिसांची पथके साध्या वेशात गस्त घालणार आहेत.  Ashadhi Wari

श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (२८ जून) प्रस्थान होणार आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळा शनिवारी (२९ जून) प्रस्थान ठेवणार आहे. रविवारी (३० जून) पालखी सोहळा पुण्यात दाखल होणार आहे. सोमवारी पालख्यांचा मुक्काम नाना पेठ आणि भवानी पेठेमधील मंदिरांमध्ये असणार आहे. मंगळवारी (२५ जून) पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात असणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर यांच्या पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात असणार आहे. पालखी आगमन, मुक्काम, प्रस्थान सोहळा विचारात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. पालखी सोहळ्यातील गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी पोलीस पेलणार असून त्या अनुषंगाने बंदोबस्त आखण्यात आला आहे. वाहतूक नियोजनासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

पालखी सोहळा बंदोबस्त तपशील 

अतिरिक्त पोलीस आयुक्त - २

पोलीस उपायुक्त - १०

सहायक पोलीस आयुक्त - २०

पोलीस निरीक्षक - १०१

सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक - ३४३

पोलीस कर्मचारी - ३ हजार ६९३

गृहरक्ष दलाचे जवान- ८००

राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकड्या

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest