पुणे: बाणेरमधील ‘एस्को बार’ जमीनदोस्त; शहरातील १९ ठिकाणी केली धडक कारवाई

पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर एफसी रस्त्यावरील 'लिक्विड लिझर लाउंज' (एल थ्री) बारमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचे समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने एफसी रस्त्यासह शहरातील तब्बल २६ ठिकाणांवरील पब, बार, रेस्टॉरंटवर धडक कारवाई केली.

संग्रहित छायाचित्र

अनधिकृत पब, बार, रेस्टॉरंटवर पुणे महापालिकेचे कारवाईचे सत्र सुरूच

पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर एफसी रस्त्यावरील  'लिक्विड लिझर लाउंज' (एल थ्री) बारमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचे समोर आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने एफसी रस्त्यासह शहरातील तब्बल २६ ठिकाणांवरील पब, बार, रेस्टॉरंटवर धडक कारवाई केली. हे कारवाईचे सत्र पुढे सुरू ठेवत बुधवारी (दि. २६) शहरातील १९ आस्थापनांचे बेकायदा ५६,०६१ चौरस फूट इतके बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. यामध्ये बाणेर भागातील एस्को बारच्या आठ हजार चौरस फूट बेकायदा बांधकामाचाही समावेश आहे.

शहरात अनेक ठिकाणी पब, बार सुरू झाल्याने रात्री उशिरापर्यंत पार्ट्या रंगत आहेत. या पार्ट्यांमध्ये आता ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचे व्हीडीओ व्हायरल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. सुसंस्कृत पुण्यात अशा पार्ट्या रंगत असल्याने पुणेकरांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे. शहरात काही घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते. त्यानंतर कारवाईचे सत्र सुरू होते. मात्र इतर वेळी प्रशासनाने जाणूनबूजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

पुण्यात सुरू झालेल्या पब, बार संस्कृतीमुळे अल्पवयीन मुले अमली पदार्थांना बळी पडत आहेत. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहे. यामुळे राजकारण तापलेले असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी महापालिका आणि पुणे पोलिसांना शहरातील अनधिकृत पब, बारवर धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांचा बंदोबस्त उपलब्ध झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून धडक कारवाई केली जात असून बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले जात आहे. तसेच त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, यासाठी तक्रार अर्ज दाखल केला जात आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. २५) ‘एल थ्री’ या बारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागाने मंगळवारी ३६,८४५ चौरस. फूट इतके बेकायदा बांधकाम पाडले. तर बुधवारी ५६,०६१ चौरस फूट असे एकूण ९२,९०६ चौरस फूट इतके बेकायदा बांधकाम पाडण्याची जोरदार कारवाई केली. अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेने या ठिकाणी केली कारवाई...

बाणेर, द कार्नर लांऊज बार ३००० चौरस फूट

बाणेर, एमएल सिटोबार १२००० चौ. फूट

बाणेर, एस्को बार ८००० चौ. फूट

बाणेर, इलीफट बार १००० चौ. फूट

बाणेर, ब्रीव्ह मार्चट कॅफे १५०० चौ. फूट

बाणेर, उरबो किचन बार ३००० चौ. फूट

बाणेर, नेटीव बार २००० चौ. फूट

बाणेर, द ज्यॉईस बॉय ८०० चौ. फूट

बाणेर, फिलेमिट बार ३२०० चौ. फूट

बाणेर, थ्री मिस्टेकटर्स ६०० चौ. फूट

बाणेर, मनाली बार १२०० चौ. फूट

बालेवाडी, डॉक यार्ड २४०० चौ. फूट

कोरेगाव पार्क, रोडमामस साऊथ मेन रोड २००० चौ. फूट

कोरेगाव पार्क, दावा शाब व इतर २२३ चौ. फूट

कोरेगाव पार्क, निरंजन कवडे ७७५5 चौ. फूट

कोरेगाव पार्क, प्रिम रेस्टोरेन्ट ८४०० चौ. फूट

कोरेगाव पार्क, टल्ली बार ६८८ चौ. फूट

शिवाजीनगर, सोशल हॉटेल एफसी रोड ४२७५ चौ. फूट

हडपसर सासवड रोड, १००० चौ. फूट

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest